शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ई-लिलावासाठी कृउबाला आदेश

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले आहेत. यादृष्टीने जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या २९ दिवसांत शेतीमालाच्या हर्राशीची पारंपरिक पद्धत बंद होऊन आॅनलाइन लिलाव पद्धत अस्तित्वात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा, बाजार समितीच्या कारभारात, लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबविण्यात यावी. यासाठी केंद्र सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल मार्केट’ (ई-नाम) पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे देशभरातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आॅनलाइन एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. यामुळे औरंगाबादेतील जाधववाडीत आलेला शेतीमाल परजिल्ह्यातील कृउबामधील खरेदीदार खरेदी करू शकतील. खरेदीदारांमध्ये स्पर्धा वाढल्याने शेतीमालास चांगला भाव मिळेल. राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ सुरूकरण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी पुणे येथे राज्यातील कृउबाच्या सचिवांची बैठक घेतली. पहिल्या टप्प्यातील सर्व बाजार समित्यांना येत्या १५ आॅगस्टच्या अगोदर आॅनलाइन लिलाव सुरूकरण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे बाजार समित्यांचे कर्मचारी कामाला लागले आहेत. केंद्र शासनाने जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ कॉम्प्युटर, १३ यूपीएस, ४ लेझर प्रिंटर, १ एलईडी, २ वेबकॅमेरे, २ टॅब्लेट आदी साहित्य दिले आहे. बाजार समितीने लीज लाइनसाठी बीएसएनएलकडे रक्कम भरली असून, येत्या ८ दिवसांत लीज लाइन टाकण्यात येणार आहे. धान्याच्या अडत बाजारातील ४ सेल हॉलमध्ये ई-लिलावासाठी संगणक व अन्य यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी सेलहॉलमध्ये छोटी केबिन तयार करण्यात येईल. येत्या बुधवारी १९ जुलै रोजी ई-लिलावाचे प्रात्यक्षिक घेतले जाईल, अशी माहिती सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. १५ आॅगस्टआधीच ई-लिलाव सुरूकरण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सॉफ्टवेअर कंपनीने बाजार समितीमध्ये एका मंडी अ‍ॅनलिस्टची नेमणूक केली आहे. ई-लिलावासाठी ५८ पैकी ४६ अडत्यांना व ८१ खरेदीदारांना कंपनीतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बाजार समितीच्या चार कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.