शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोरडेवाडीच्या चालकाचा मृत्यू प्रकरण वेगळ्या वळणावर !

By admin | Updated: March 2, 2016 23:09 IST

बीड / विडा : इंधन वाहतूक करणाऱ्या कोरडेवाडी (ता. केज) येथील एका टँकरचालकाचा मृतदेह आत्महत्या केलेल्या अवस्थेत बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आला.

बीड / विडा : इंधन वाहतूक करणाऱ्या कोरडेवाडी (ता. केज) येथील एका टँकरचालकाचा मृतदेह आत्महत्या केलेल्या अवस्थेत बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आला. मयत चालकाचा क्लिनर मुलगा त्यांच्यासोबत होता. तो फरार असल्याने घटनेचा गुंता वाढला आहे. दरम्यान, मुलीने ‘माझे वडील आत्महत्या करु शकत नाहीत’ असा दावा करुन घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. संतराम बाळूदेव वरपे (वय ५२) असे मयत चालकाचे नाव आहे. पत्नी, दोन मुले, चार मुली, नातवंडे असा त्यांचा भरला संसार. इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरवर ते चालक म्हणून काम करायचे. परळीत ते पत्नी, मोठा मुलगा व सुनेसोबत राहत होते. त्यांचा मुलगा हनुमंत हा त्यांच्यासोबतच क्लिनर म्हणून आहे. सोलापूरहून परळीला इंधन आणायचे हा त्यांचा दिनक्रम! सोमवारी रात्री सोलापूरहून परळीला जाण्यासाठी ते मुलासोबत निघाले. मात्र, परळीत पोहोचण्यापूर्वी काय घडले? त्याचे गूढ कायम आहे. तुळजापूरजवळ त्यांच्या टँकरला अपघात झाला, स्वत:च्या अंगातील शर्टने गळफास घेतलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह येडशी (जि. उस्मानाबाद) शिवारातील एका झाडाला लटकलेला आढळून आला. त्यामुळे संतराम यांच्यासोबत नेमके काय झाले? याचा उलगडा होत नाही. येडशी पोलिसांनी पंचनामा करुन संतराम यांचा मृतदेह त्यांचा भाऊ, पुतण्याच्या ताब्यात दिला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान मुलगा श्रीराम याने भडाग्नि दिला. दरम्यान, या घटनेपासून मयत संतराम यांचा मुलगा हनुमंत हा गायब आहे. तो त्यांच्यासोबत क्लिनर म्हणून होता. त्यामुळे वडिलाच्या मृत्यूमागचा ‘क्ल्यू’ त्याच्याकडे आहे.मात्र, तो ना नातेवाईकांना भेटला ना पोलिसांना! वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही तो उपस्थित नसल्याने संशयाची सुई त्याच्या दिशेने जात आहे. (प्रतिनिधी)