शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्याच्या आरोग्याचा भार केवळ दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे; परंतु या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात डझनभर पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला.

शिरूर अनंतपाळ : तालुक्याच्या आरोग्याचा भार केवळ दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे; परंतु या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात डझनभर पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, पाच वर्षांपासून स्त्री परिचराविना प्रसूती विभाग सुरू असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास ‘समस्येचा’ विळखा पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्याची निर्मिती होऊन चौदा वर्षे उलटली आहेत. तरीही येथे ग्रामीण रुग्णालय सुरू झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा भार साकोळ आणि शिरूर अनंतपाळ येथील आरोग्य केंद्रावर आहे. परंतु, या दोन्ही आरोग्य केंद्रांत गेल्या पाच वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या डझनभर रिक्त जागा भरल्या नसल्याने रुग्णसेवा रामभरोसे सुरू आहे. प्रसूती विभागासारखा अत्यंत महत्त्वाचा विभाग पाच वर्षांपासून हंगामी अप्रशिक्षित महिलेवर सुरू आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, डाटा एन्ट्री आॅपरेटर अशी अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णसेवा देण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, आरोग्य केंद्रास समस्यांचा विळखा पडला असल्याने डॉक्टरांनाच कर्मचारी, परिचर अशा वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागत आहेत. डझनभर पदे रिक्त...शिरूर अनंतपाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सहाय्यक, दोन आरोग्य सेविका, दोन आरोग्य सेवक, शिपाई, स्त्री परिचर, औषध निर्माण अधिकारी अशी दहा पदे रिक्त आहेत. तर साकोळ अंतर्गत एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तीन कंत्राटी कर्मचारी असे दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून डझनभर पदे रिक्त आहेत. परिणामी, रुग्णसेवा कोलमडली आहे. याबाबत येथील प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी देवंगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागेचा अहवाल जिल्हा परिषदेस कळविण्यात आला असून, त्या लवकरच भरल्या जातील, असे सांगण्यात आल्याचेही डॉ. देवंगरे यांनी सांगितले.