शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदनचे वाळूमाफिया सिल्लोडचे ‘किंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:48 IST

भोकरदनच्या वाळू माफियांचा सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ सुरू असून, वाळू माफियांना संबंधित पोलीस पाठीशी घालत आहेत. मिळणाºया हप्त्यांमुळे तस्करी रोखणारी यंत्रणा हतबल झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील दिग्गज वाळूमाफिया भूमिगत असल्याने भोकरदन, जाफ्राबादचे वाळू माफिया सिल्लोडचे ‘किंग’ बनले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भोकरदनच्या वाळू माफियांचा सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ सुरू असून, वाळू माफियांना संबंधित पोलीस पाठीशी घालत आहेत. मिळणाºया हप्त्यांमुळे तस्करी रोखणारी यंत्रणा हतबल झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील दिग्गज वाळूमाफिया भूमिगत असल्याने भोकरदन, जाफ्राबादचे वाळू माफिया सिल्लोडचे ‘किंग’ बनले आहेत.रॉयल्टीची एक कोरी पावती माफिया सोबत ठेवतात. पोलिसांनी वाहन पकडले की, लगेच त्यावर तारीख आणि वेळ टाकली जाते. या पावतीवर कित्येक दिवस अवैध वाळू वाहतूक चालते. हा गोरखधंदा चालवून वाळू माफिया शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या वाळू तस्करीकडे पोलिसांचे लक्ष का जात नाही, हा मोठा प्रश्न आहे.पोलिसांचे लोकेशन घेणारी यंत्रणाजे अधिकारी हप्ते घेत नाहीत अशा अधिकाºयांवर नजर ठेवण्यासाठी वाळूमाफियांनी पगारी खबरे ठेवले असून, त्यांची खाजगी गुप्तचर यंत्रणा सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, त्यांचे निवासस्थान याशिवाय चौकाचौकातील नाक्यावर तैनात असते. ज्या मार्गावर हे अधिकारी फिरतात त्या मार्गावर हे खबरे वाहने फिरवून वाळू वाहनांचा मार्ग बदलवून टाकतात.वाळूच्या टिप्परसोबत बॉडीगार्डज्या रस्त्यावर वाळूचे टिप्पर चालतात, त्या टिप्परसोबत व पाठीमागे एका व्हीआयपी वाहनात ४-५ बॉडीगार्ड, तडजोड करणारी यंत्रणा, मोटारसायकलवर पोलिसांचे लोकेशन घेणारी यंत्रणा असल्याने कारवाई होत नाही.सिल्लोड येथे नुकतेच आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार एकाकी वाळू माफिया, गोमांस तस्करांशी झुंज देत आहेत. काही स्थानिक पोलीस मात्र माफियांशी मिळालेले आहेत. यामुळे पोलिसांचे ‘टीमवर्क’ दिसत नाही. अधिकारी ऐकत नसतील तर अवैध धंदे करणाºया कर्मचाºयांना पकडून चांदी करून घेतात. त्यामुळे अधिकारी सोडून त्यांच्या कर्मचाºयांनाच जास्त भाव आला आहे. रात्री गस्त घालून गुन्हे रोखण्याऐवजी गुन्हेगारांना मदत करण्याचे काम काही पोलीस करताना दिसतात.लाखो रुपये हप्तेआधी महिन्याला १० ते १५ हजार रुपये दिले जाणारे हप्ते वाढले असून, एका टिप्परचा एक ते दीड लाख रुपये महिना हप्ता संबंधित यंत्रणेला दिला जातो.सिल्लोड तालुक्यातील सर्व वाळूपट्टे बंद असल्याने सिल्लोड शहरासह तालुक्यात वाळूमुळे अनेकांच्या घराचे बांधकाम बंद आहे. जो जास्त पैसे मोजेल, त्यांना वाळू विकत मिळत आहे.राजकीय दबाव वापरून, तर काही स्थानिक कर्मचाºयांना हाताशी धरून, तर कुठे हप्ते वाढवून भोकरदनच्या वाळू माफियांनी सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ सुरू केला आहे. दररोज भोकरदन, जाफ्राबादकडून १० ते १५ टिप्पर सिल्लोड शहर व तालुक्यात येतात.राजकीय दबावामुळे बदलीअजिंठ्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर वानखेडे यांनी वाळू माफियांवर कारवाई केल्याने गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांची तडकाफडकी गंगापूर येथे बदली करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील पोलिसांचे व काही अधिकाºयांचे मनोधैर्य खचले आहे. धंदे चालू दिले तर वरिष्ठ अधिकाºयांचा दबाव, कारवाई केली तर राजकीय दबाव, यामुळे पोलिसांनी आपले हित साधून बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. यामुळे तालुक्यात अवैध धंदे बोकाळले आहेत.