शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:40 IST

चौदा दिवस उलटले तरी महापालिका कचरा कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे शहरातील त्रस्त नागरिकांनी ठिकठिकाणी पडलेल्या कच-याला आग लावली. त्यामुळे दिवसभर शहरातील विविध भागांत धुराचे लोट दिसून येत होते. धुरामुळे आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कचºयाला आग लावण्याच्या या दळभद्री प्रकारामुळे विशेषत: दम्याच्या रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देधुराचे लोट : त्रस्त झालेल्या नागरिकांचा मनपाविरुद्ध संताप; दुर्गंधीनेही जनता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चौदा दिवस उलटले तरी महापालिका कचरा कोंडीचा प्रश्न सोडवू शकली नाही. त्यामुळे शहरातील त्रस्त नागरिकांनी ठिकठिकाणी पडलेल्या कच-याला आग लावली. त्यामुळे दिवसभर शहरातील विविध भागांत धुराचे लोट दिसून येत होते. धुरामुळे आसपासच्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कच-याला आग लावण्याच्या या दळभद्री प्रकारामुळे विशेषत: दम्याच्या रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.नारेगाव येथे शेतक-यांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. नारेगाव कचरा डेपोवर एकही ट्रक १४ दिवसांमध्ये गेला नाही. सुरुवातीला महापालिकेने काही वॉर्डातील कचरा उचलून जिरवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोगही अयशस्वी ठरला. त्यानंतर कचरा जशास तसा पडून आहे. या कच-यामुळे परिसरात राहणा-या नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत होत्या. अखेर बुधवारी महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कच-याच्या डोंगराला नागरिकांनीच आग लावून दिली. दिवसभर या कचºयातून धूर निघत होता. ओला व सुका कचरा एकत्र असल्याने धुरामुळे परिसरात राहणा-या आणि रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हाच प्रकार इतर वसाहतींमध्येही सुरू होता. दम्याच्या रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. सर्वसामान्य नागरिकांची चिंता न करणारी महापालिका दम्याच्या रुग्णांची चिंता काय करणार, असा प्रश्नही नागरिक करीत आहेत.शहरात दररोज चारशे मेट्रिक टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून हा कचरा नारेगाव कचरा डेपोवर नेऊन टाकण्यात येत होता. या कच-यावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नव्हती. मागील १४ दिवसांमध्ये मनपाने कचराच उचलला नाही. त्यामुळे शहरातील विविध वसाहतींमध्ये जवळपास साडेचार हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. कचरा उचलला तर नेऊन कुठे टाकावा हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावत आहे. महापालिकेने मागील काही दिवसांपासून शासकीय आणि खाजगी जागांचा पर्याय शोधला. प्रत्येक ठिकाणी कचरा टाकण्यास विरोधच झाला. त्यामुळे हतबल महापालिका आता न्यायालय काही तरी तोडगा काढेल या अशी अपेक्षांची प्रतीक्षा करीत आहे.