औरंगाबाद : ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी गेलेल्या तरुणीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.१३) सकाळी सातारा परिसरात घडली. याप्रकरणी सातारा ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.आदेश भालचंद्र देशमुख असे संशयित आरोपीचे नाव आहे. सातारा परिसरातील अपहृत मुलीच्या मातेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ब्युटी पार्लर प्रशिक्षणाला जाते असे सांगून ती घराबाहेर पडली. मात्र ती घरी न परतल्याने, शिवाय तिच्याशी संपर्क होत नसल्याने आपल्या मुलीचे आदेश देशमुख यानेच अपहरण केले, अशी तक्रार तिने नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हेडकॉन्स्टेबल बऱ्हाटे तपास करीत आहेत.
मुलीचे अपहरण; तरुणाविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: October 16, 2016 01:12 IST