शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण; वडगावच्या सरपंचासह ६ जणांविरुद्ध सिल्लोडमध्ये तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:32 IST

अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करूनये म्हणून वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सरपंच महेश भोंडवे यांनी  साथीदारांसह ग्रा.पं. सदस्या वैशाली जिवरग व त्यांचे पती काकाजी जिवरग यांना पिस्तूलचा धाक दाखूवन सिल्लोडमधून अपहरण केल्याची तक्रार गजानन जिवरग यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात दिली आहे. 

सिल्लोड-वाळूज महानगर : अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करूनये म्हणून वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सरपंच महेश भोंडवे यांनी  साथीदारांसह ग्रा.पं. सदस्या वैशाली जिवरग व त्यांचे पती काकाजी जिवरग यांना पिस्तूलचा धाक दाखूवन सिल्लोडमधून अपहरण केल्याची तक्रार गजानन जिवरग यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात दिली आहे. 

वडगाव कोल्हाटी ग्रा.पं. चे सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे यांच्यावर १२ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. २ मे रोजी त्या संदर्भात विशेष सभा बोलावली आहे. हे १२ सदस्य आठवडाभरापूर्वीच अज्ञातस्थळी सहलीवर गेले आहेत. यातील वैशाली जिवरग या पतीसह काही कामानिमित्त सिल्लोड येथे दीराकडे गेल्या होत्या. वैशाली जिवरग यांना गाठून त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करू नये म्हणून सरपंच भोंडवे, उपसरपंचाचा मुलगा राम पाटोळे व गिरणीवाला त्रिभुवन यांच्यासह अन्य तीन जणांनी जिवरग दाम्पत्याला पिस्तूलचा धाक दाखवून सिल्लोडमधील गजबजलेल्या टिळकनगरातून शनिवारी सायंकाळी अपहरण केले. या प्रकरणी गजानन जिवरग यांच्या तक्रारीवरून सिल्लोड पोलीस ठाण्यात वडगावचे सरपंच महेश भोंडवे, राम पाटोळे, त्रिभुवन व अन्य तीन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला,

तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव ...भाऊ काकाजी जिवरग व वहिनी वैशाली जिवरग यांचे अपहरण झाल्याची तक्रार द्यायला गजानन जिवरग हे पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा शिवसेनेच्या एका नेत्याने पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार घेऊ नका, असे सांगितले. शिवाय तक्रारदार जिवरग यांच्यावरही दबाव टाकण्यात आला. घाबरलेले जिवरग दुपारी ठाण्यातून निघून गेले. सायंकाळी पुन्हा तक्रार द्यायला आले. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

सरपंचावर गोव्यातही गुन्हा १५ दिवसांपूर्वीच महेश भोंडवे यांना विना परवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता सिल्लोड  ठाण्यात पुन्हा अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांवर दबाव नाहीघटना शनिवारी संध्याकाळी घडली. तक्रारदार रविवारी दुपारी आला आणि अपूर्ण तक्रार देऊन निघून गेला. त्यानंतर रविवारी संध्याकाळी पुन्हा तक्रार दिली. तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांवर कुणाचा दबाव नाही. उशिरा तक्रार दिली म्हणून उशिरा गुन्हा दाखल झाला, चौकशीअंती सत्य समोर येईल, असे सिल्लोडचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :KidnappingअपहरणElectionनिवडणूकAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस