शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख रुपयांसाठी माजलगावातून नातीचे अपहरण

By admin | Updated: July 2, 2017 00:34 IST

माजलगाव : शहरातील दत्त कॉलनी भागातील असद काझी यांचे सासू-सासऱ्याने दोन लाख रुपयांसाठी शनिवारी दुपारी नातीचे अपहरण केल्याची घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शहरातील दत्त कॉलनी भागातील असद काझी यांचे सासू-सासऱ्याने दोन लाख रुपयांसाठी शनिवारी दुपारी नातीचे अपहरण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अपहृत मुलीच्या आईने तिच्या आई-वडिलांसह ५ जणांविरूध्द शहर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.दत्तनगरमध्ये राहणाऱ्या असद व आशिया काझी हे दाम्पत्य लहान बाळास दुपारी ३ च्या दरम्यान दुखत असल्यामुळे रुग्णालयात घेवून गेले होते. घरी त्यांची लहान मुलगी मरीयम (७) खेळत होती. दरम्यान, आशिया काझी यांचे परभणी येथील आई-वडिलांसह भाऊ, बहीण व तिचा पती घरी आले. त्यांनी खेळत असलेल्या मरीयमला रिक्षात बसवून पळ काढला. मुलीस पळून नेत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी असद काझी यांना ही माहिती फोनद्वारे कळवली. ते तात्काळ घरी आले व त्यांनी माहिती घेऊन बसस्थानक गाठले. मात्र, त्यांना तेथे कोणीही आढळून आले नाही. त्यांनी तात्काळ त्यांचे सासू-सासऱ्यांना फोन करून तुम्ही मुलीस का पळविले असे विचारले. यावर २ लाख रुपये आणून दे व तुझ्या मुलीस घेऊन जा असे उत्तर मिळाले.यानंतर काझी दाम्पत्याने यांनी तात्काळ शहर ठाणे गाठले. पोलिसांनी संबंधितांस फोन केला असता त्यांनी मुलगी आमच्यासोबत असल्याचे सांगितले. आशिया काझी यांनी तिचे वडील शेख नूर, आई हुसेनाबी, भाऊ शेख सिवंसदर, बहीन रुबीना व तिचा पती शेख मुन्वर यांच्याविरूध्द मुलीस पळविल्याची व खंडणी मागत असल्याची तक्रार शहर ठाण्यात दिली. ठाण्यात अपहरणाची तक्रार आली असतानाही पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही. तसेच मुलीच्या शोधासाठीही प्रयत्न केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी काझी दाम्पत्य रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते.