शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात सैराट... फसवणूक... पश्चात्ताप अन् नंतर सुटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:30 IST

जालना : पुण्याला नातेवाईकांकडे शिक्षणासाठी गेलेल्या जालन्याच्या युवतीला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणीने सैराट होत त्याच्यासोबत संसार सुरू केला; परंतु काही दिवसांतच खोलीत बंदिस्त करून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पुण्याला नातेवाईकांकडे शिक्षणासाठी गेलेल्या जालन्याच्या युवतीला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणीने सैराट होत त्याच्यासोबत संसार सुरू केला; परंतु काही दिवसांतच खोलीत बंदिस्त करून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कसाबसा नातेवाईकांशी संपर्क केला. नातेवाईकांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट घेतली. खोतकरांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला अन् पुणे पोलिसांनी सदर युवतीची सुटका केली.कोमल (२१ नाव बदलले) पुणे येथे नातेवाइकांकडे शिक्षण घेत खासगी नोकरी करायची. अशोक (२० नाव बदलले) याने कोमलला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशोकचे वय कमी असल्यामुळे त्यांनी लग्न न करता एकत्र राहण्याचे ठरवले. आई-वडील व नातेवाईकांचा विरोध डावलून कोमल पुण्यात अशोकच्या घरी राहू लागली. गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या अशोकच्या नातेवाईकांनी कोमलच्या नातेवाईकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने त्यांचा नाईलाज झाला. काही दिवस सुरळीत गेल्यानंतर अशोकच्या नातेवाइकांनी कोमलचा छळ सुरू केला. अशोकनेही कोमलकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. फोन हिसकावून घेत तिला एका खोलीत बंदिस्त करण्यात आले. अशोकची आई, दीर, जावा कोमलला सतत मारहाण करायचे. त्यांच्याप्रमाणे राहण्यास सांगायचे.‘जगण्याने छळले होते, आता मरणानेच होईल सुटका’, असे कोमलला वाटू लागले. नातेवाइकांशी तिचा संपर्क होऊ दिला जात नसे. कोमलने एके दिवशी रात्रीच्या वेळी खोलीत झोपलेल्या सासूच्या फोनवरून जालन्यातील नातेवाईकांना चोरून फोन केला. सर्व हकीकत सांगितली.काही दिवसानंतर पुन्हा फोन करून आपला प्रचंड छळ सुरू असून, एक दिवस हे लोक मला मारून टाकतील, माझी सुटका करा, अशी आर्त विनवणी केली. मात्र, भीतीपोटी तिच्या नातेवाइकांचे अशोकच्या घरी जाण्याचे धाडस झाले नाही. त्यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. खोतकरांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क केला.कोमलच्या नातेवाईकांना पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी पुण्याला पाठविले. सर्व प्रकार समजल्यानंतर पुणे पोलिसांच्या एका पथकाने कायदेशीर कारवाई करून कोमलची अशोकच्या घरातून सुटका करीत तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केले. कोमलच्या नातेवाईकांना सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कृष्णा तंगे यांचेही सहकार्य मिळाले.