खुलताबाद : आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या खुलताबाद पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे काम अर्ध्याच्यावर झाले आहे. मात्र, आता कामासाठी निधीच नसल्याने काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खुलताबाद पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ३० ऑगस्ट २०१९ रोजी युवासेनेचे प्रमुख तथा सध्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात झाले होते. तीन कोटी रुपये खर्चाची खुलताबाद पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे देखणेे बांधकाम सुरू आहे. या इमारतीत जि.प.अंतर्गत असलेलेले सर्व विभाग राहणार आहे. सदरील इमारतीचे पन्नास टक्के बांधकाम पूर्ण झाले असले तरी अद्याप बांधकामासाठीचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे काम रखडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे या इमारतीचे बांधकाम पहिलेच चार महिने रखडले होते.
चौकट
म्हैसमाळ रस्त्याचेही अर्धवट बांधकाम
खुलताबाद - म्हैसमाळ रस्ताही केवळ निधी नसल्याने दीड वर्षापासून बंद पडला आहे. यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याचे कामही लवकर होणे आवश्यक आहे.
फोटो कॅप्शन : खुलताबाद पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे सुरू असलेले बांधकाम.