शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खोतकर-सत्तार यांची औरंगाबादेत ‘चाय पे चर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 12:26 IST

कार्यकर्त्यांसमवेत अर्जुन खोतकरजालन्याहून नाशिककडे चालले होते.

औरंगाबाद : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर व औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांची गुरुवारी दुपारी औरंगाबादेत ‘चाय पे चर्चा’ झाली. सत्तार यांनी खोतकरांना काँग्रेसमध्ये प्रवेश करून जालना लोकसभेची निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढण्याची पुन्हा एकदा गळ घातली. तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो, अशी हमीही त्यांनी दिली; पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यास खोतकरांनी प्रतिसाद दिला नाही. 

अब्दुल रशीद पहिलवान व फिरोज लाला तांबोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसमवेत अर्जुन खोतकर हे दुपारी जालन्याहून नाशिककडे चालले होते. औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी सत्तार यांना फोन केला व चहा पिण्याच्या निमित्ताने काँग्रेसचे कार्यकर्ते फिरोज पटेल यांच्या बीड बायपास रोडवरील कार्यालयात दोघेच चर्चा करीत बसले. साधारण एक तासभर ही चर्चा चालली. दोन दिवसांत गोड बातमी देतो, असे सत्तार म्हणाले, तर आमची ही वैयक्तिक भेट होती, असे खोतकर यांनी सांगितले.

सत्तार यांनी सांगितले की, रावसाहेब दानवे हे खोतकरांना सतत त्रास देत आहेत. आता जर ते दानवे यांच्याविरुद्ध लढले नाहीत, तर त्यांचे राजकारणच संपेल. माझे व खोतकरांचे पारिवारिक संबंध आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडेन. 

जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी उमेदवार राहू, अशी घोषणा बुधवारी पत्रपरिषदेत अब्दुल सत्तार यांनी केली होती. याला चोवीस तास उलटत नाहीत तोच खोतकर व सत्तार यांच्यातील ‘चाय पे चर्चे’ने तर्कवितर्क लावणे सुरू झाले. 

खोतकर २ लाख मतांनी विजयी होतील ‘अर्जुन खोतकर हे दोन लाख मतांनी विजयी होतील. ते विजय प्राप्त करतात की, रणछोडदास बनतात, हे तुम्ही त्यांनाच विचारा,’ असेही सत्तारांनी म्हटले होते. गेल्या दोन वर्षांपासून खोतकर २३ वेळा दानवेंविरुद्ध लढणारच, असे बोलले आहेत.याची जाणीव त्यांनी ठेवली, तर चकवा निश्चित बसेल, अशा शब्दांत खोतकरांना टोला लगावला. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAbdul Sattarअब्दुल सत्तारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९