शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचे सर्वेक्षणही खोटे

By admin | Updated: July 25, 2016 01:09 IST

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहरात खड्डे का शहर खड्ड्यात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहरात खड्डे का शहर खड्ड्यात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मागील दीड महिन्यापासून खड्ड्यांची ओरड अधिकच वाढल्याने मनपा प्रशासनाने प्रमुख रस्त्यांवर खड्डे किती याचे सर्वेक्षण केले. संपूर्ण शहरात फक्त ४ हजार ८५१ खड्डे असल्याचा जावईशोध लावण्यात आला आहे. शहरात किमान ४ लाख खड्डे असताना ही संख्या कमी दाखविण्याचा केविलवाणा प्रताप अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या धादांत खोटारडेपणानंतरही मनपातील लोकप्रतिनिधी खड्ड्यांच्या मुद्यावर संयमी भूमिका घेत आहेत.यंदा शहरात धो-धो पाऊसही झालेला नाही. औरंगाबाद तालुक्यात आतापर्यंत फक्त ३२९ मि. मी. पाऊस झाला आहे. दरवर्षीच्या सरासरीपेक्षा किंचित जास्त पाऊस यंदा झाला आहे. मागील दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदा खड्ड्यांची संख्याही अफाट वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो. सिमेंट रस्ते वगळता इतर सर्व डांबरी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे थोडेही पाणी साचलेले असले तर वाहनधारकांची त्यावेळी काय अवस्था होत असेल...! याचा साधा विचारही महापालिका प्रशासन करायला तयार नाही.मागील आठवड्यात महापौर त्र्यंबक तुपे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत नेहमीप्रमाणे खड्ड्यांचा मुद्या चर्चेला आला. या चर्चेला पूर्णविराम कसा द्यावा याचे कसब अधिकाऱ्यांना आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहीरपणे सांगितले की, आम्ही वॉर्डनिहाय प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करीत आहोत. दोन दिवसांत यासंबंधीचा अहवालही प्राप्त होणार आहे. त्यानंतर लगेचच कारवाईला सुरुवात होईल. पदाधिकाऱ्यांना पुढे बोलण्यासाठी काही शिल्लकच राहिले नाही. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, आयुक्त हटाव आदी अनेक मुद्यांवर महापालिकेचे सभागृह डोक्यावर घेणारे नगरसेवक खड्ड्यांच्या मुद्यावर संयमी भूमिका का घेतात, असा औरंगाबादकरांना प्रश्न पडला आहे.‘लोकमत’ने महापालिकेच्या सर्वेक्षणाचा अधिक तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता विदारक सत्य समोर आले. सर्व वॉर्ड कार्यालयांच्या दुय्यम आवेक्षक, कनिष्ठ अभियंते, उपअभियंते यांना ‘वरिष्ठांनी’सूचना दिल्या की, खड्डे कमी दाखवा. अगोदर या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे खड्ड्यांची संख्या नमूद केली होती. ं‘साहेबांचा’आदेश आल्यावर ८० टक्के खड्डे वगळण्यात आले. प्रमुख रस्त्यांवरील मोजकेच खड्डे औपचारिकता म्हणून रेकॉर्डवर घेण्यात आले. खड्ड्यांची वास्तविक संख्या दाखविली तर आपलेच पितळ उघडे पडेल अशी भीती अधिकाऱ्यांना भेडसावत आहे.