शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी

By admin | Updated: June 5, 2017 00:27 IST

जालना : जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांचे प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी ‘उन्नत कृषी समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व योग्य दराने उपलब्ध व्हावी, बियाण्यांचा काळाबाजार रोखला जावा यासाठी नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.सध्या शेतात नांगरणी, वखरणीसह मशागतीची अन्य कामे सुरू आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात सहा लाख २६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती, हे क्षेत्र यंदा २६ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. यंदा खरिपाच्या एकूण क्षेत्रामध्ये एक लाख ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, ८३ हजार हेक्टरवर मका, २९ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. एक लाख ६३ हजार हेक्टरवर तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे. तर मागील वर्षी दोन लाख ३४ हजार हेक्टरवर असणारे कापसाचे क्षेत्र यंदा २० टक्याने घटण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात हेक्टरी पीक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने वेगवेळ्या पातळ्यांवर नियोजन केले आहे. जिल्हास्तरावर बियाणे सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून कापूस, सोयाबीन व कडधान्य बियाण्यांच्या वितरणावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध, अप्रमाणित बियाण्यांची व्रिकी होऊ नये याकरिता निरीक्षकांमार्फत बियाण्यांचे नुमने काढण्यात आले आहेत. बि-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके याचा काळबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यास एक तर जिल्हास्तरावर एक, अशा नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विभागाने उपाययोजना केल्या असून, त्याची अमलबजावणी केली जात आहे.