शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाची उत्पादकता घटणार

By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST

यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

नांदेड: मागील तीन वर्षांत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगावरुन जिल्ह्यातील कपाशी व सोयाबीनच्या उत्पादकतेत दुपटीने वाढ झाली होती, परंतु यंदा अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या उत्पादकतेत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने महसूल मंडळ स्तरावर काही गावांची निवड करुन तालुकानिहाय, पीकनिहाय पीककापणी प्रयोग घेतले जातात. यावरुन पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढले का कमी झाले हे स्पष्ट होते. कृषी कार्यालयाने २००९-१० मध्ये घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगावरुन कपाशीचे हेक्टरी उत्पन्न ५ क्विंटल २७ किलो एवढे निघाले, तर सोयाबीनचे ४ क्विंटल ३७ किलो ऐवढे आले होते. यानंतर २०११-१२ मध्ये घेण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगात कपाशीच्या हेक्टरी क्षेत्रात तीन क्विंटलने वाढ होवून ८ क्विंटल ५७ किलोवर पोहोचले. तर सोयाबीनचे उत्पन्न दुपटीने वाढून १२ क्विंटल ५४ किलोवर पोहोचले. यानंतर २०१२-१३ या वर्षात अल्पश: पावसामुळे सोयाबीन, कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे शेतकरी म्हटले तरी कृषी विभागाने घेतलेल्या पिक कापणी प्रयोगावरुन कपाशीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न ९ क्विंटल ४६ किलो झाले आहे. तसेच सोयाबीनचे उत्पन्न १५ क्विंटल ४४ किलो निघाल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे वरील आकडेवारीवरुन गेल्या तीन वर्षांत सोयाबीन, कपाशीच्या उत्पादकतेत सरासरी दुपटीने वाढ झाल्याचे दिसते.यंदा कापूस, सोयाबीनसह अन्य सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने उत्पादकताही निम्यावर येईल, की नाही हे सांगणे कठीण आहे. (प्रतिनिधी)