शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खाम नदीला मिळणारे सर्व नाले स्वच्छ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महापालिकेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत खाम नदी पुनरुज्जीवन मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागातून ही मोहीम राबवली जात आहे. ...

औरंगाबाद : महापालिकेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत खाम नदी पुनरुज्जीवन मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागातून ही मोहीम राबवली जात आहे. पावसाळ्यापूर्वी खाम नदीला मिळणारे सर्व नाले स्वच्छ करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्याचे आदेश पालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी प्रशासनाला दिले.

छावणी परिसरालगत असलेल्या खाम नदीच्या लोखंडी पुलाजवळील भागापासून पालिका आयुक्‍त पाण्डेय यांच्या पुढाकाराने खाम नदीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. महिनाभरापासून दर शनिवारी लोकसहभागातून नदीपात्रातील कचरा उचलला जात असून, वृक्षांची लागवड केली जात आहे. आतापर्यंत पात्राच्या दोन्ही बाजूने दोन हजार रोपांची लागवड केली असून, तीन टन कचरा उचलण्यात आला आहे. खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात पालिकेसोबतच स्मार्ट सिटीची टीम, इको सत्व, व्हेरॉकसह विविध संस्था, संघटना व नागरिक सहभागी झाले आहेत. दर शनिवारी नदीतील कचरा आणि घाण काढून नदी स्वच्छ केली जात आहे. या नदीला शहरातील छोटे-मोठे नाले येऊन मिळतात. त्यातील घाण नदीत येऊन खाम नदी प्रदूषित होते. याला प्रतिबंध करण्यासाठी खाम नदीला मिळणारे सर्व नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करावे, त्यासाठी लागणारे कर्मचारी, यंत्रणा तातडीने उभी करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश पाण्डेय यांनी पाहणीदरम्यान अधिकार्‍यांना दिले. यावेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कळ शिवम, पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, ‘इको सत्व’च्या नताशा झरीन, उपअभियंता यांत्रिकी डी. के. पंडित, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार आदी उपस्थित होते.