शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी लाटे’त निवडून आलेल्या खैरेंचा लोकसभेत पुन्हा प्रवेश अशक्य - आमदार सतीश चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 16:14 IST

२०१४ साली ‘मोदी लाटे’त चंद्रकांत खैरे यांना जनतेने निवडूण दिले. आगामी लोकसभा निवडणूकीत मोदी लाट असणार नाही. तेव्हा खा. खैरे यांच्या विरोधातील नाराजीमुळे त्यांची लोकसभेत पुन्हा एंट्री होण्याची शक्यता धुसर असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देवेळ आली तर खासदारकी लढविण्याचे चव्हाण यांचे संकेत भाजपकडे लोकसभेचा उमेदवार नाही, त्यांना उमेदवार आयात करावा लागेल जिल्हाध्यक्षपदासाठी विचारण्यात आल होत, मात्र त्यास नकार कळवला

औरंगाबाद,दि. १५  : २०१४ साली ‘मोदी लाटे’त चंद्रकांत खैरे यांना जनतेने निवडूण दिले. आगामी लोकसभा निवडणूकीत मोदी लाट असणार नाही. तेव्हा खा. खैरे यांच्या विरोधातील नाराजीमुळे त्यांची लोकसभेत पुन्हा एंट्री होण्याची शक्यता धुसर असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला. सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास अन् पक्षाने आदेश दिला तर खासदारकी लढविण्याचे संकेतही चव्हाण यांनी दिले.

आ. चव्हाण यांच्यातर्फे दिवाळी पाडव्यानिमित्त ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज्यात आगामी निवडणूकीत सत्तांतर होणार असल्याचा दावा केला. निवडणूकांनी आणखी दिड वर्ष बाकी आहे. तेव्हा त्याविषयी आताच भाकित वर्तविणे कठिण आहे. मात्र २०१४ प्रमाणे पुढील निवडणूकीत मोदी लाट असणार नाही. केंद्रात भाजपाच मोठा पक्ष ठरेल. मात्र आतासारखी परिस्थिती असणार नाही.

विधानसभा व लोकसभा निवडणूका एकत्रच होणार आहेत. खा. खैरे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार दिल्यास त्यांना पुन्हा निवडून येणे शक्य होणार नाही. खैरे यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे खैरेंना पुन्हा लोकसभेत इंट्री करणे कठिण होईल. यातच सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूकीला सामोरे गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्यास सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. निवडणूक लढविण्यापूर्वी लोकांचा कल पाहणार असल्याचे स्पष्ट संकेत आ. चव्हाण यांनी दिले.

विभागीय आयुक्त भापकर भाजपचे उमेदवार होणार?यावेळी आ. चव्हाण यांना विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर लोकसभा निवडणूकीपूर्वी सेवानिवृत्त होत आहेत. ते भाजपाकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होत असल्याचे विचारले. त्यावर आ. चव्हाण यांनी भाजपाकडे उमेदवारच नाही. त्यांना उमेद्वारच आयातच करावा लागणार असल्याचे सांगितले. यात डॉ. भापकर यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. मात्र त्याला आणखी अवधी असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद नाकारलेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. आ. भाऊसाहेब चिकटगाकवर यांच्यावर प्रभारी जबाबदारी देण्यात आलेली आहे. याविषयी विचारले असता, चव्हाण म्हणाले,  जिल्हाध्यक्ष होण्यासाठी पक्षाने विचारले होते. मात्र त्यास नकार कळवला असल्याचे सांगितले.