शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिकमुळे रॉकेलचा सुकाळ

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

औरंगाबाद : रेशनवरील धान्य आणि रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक पद्धतीचे फायदे दिसण्यास सुरुवात झाली आहे

औरंगाबाद : रेशनवरील धान्य आणि रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक पद्धतीचे फायदे दिसण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत रेशन दुकानदारांना वितरणासाठी दिलेले रॉकेल कधीही शिल्लक राहत नव्हते. मात्र, बायोमेट्रिक पद्धत लागू केलेल्या दुकानांवर आता ते शिल्लक राहत आहे. चालू महिन्यात १८ दुकानांवर २४०० लिटर रॉकेल शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.जिल्ह्यात एकूण १७७७ रेशन दुकाने आहेत. या दुकानांमधून रेशनकार्डधारकांना दरमहा अन्नधान्य आणि रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र, अनेक लाभार्थी रेशनवरून अन्नधान्य किंवा रॉकेल घेऊन जात नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा रेशन दुकानांवर काही कोटा शिल्लक राहतो.परंतु अनेक दुकानदार हा कोटा वितरित झाल्याचे दाखवून त्याची काळ्याबाजारात विक्री करतात. हा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरात रेशन दुकानांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत लागू केली. याअंतर्गत आतापर्यंत औरंगाबाद शहरातील ९ आणि फुलंब्रीतील ९, अशा १८ दुकानांवर बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली आहेत. रेशन दुकानदारांना टॅब्लेटचे वाटप करण्यात आले असून, त्यात लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आणि त्यांच्या बोटांचे ठसे साठविण्यात आलेले आहेत. हे ठसे जुळल्यानंतरच त्या ठिकाणी धान्य दिले जाते. हे टॅब्लेट आॅनलाईन पद्धतीने सर्व्हरशी जोडलेले आहेत. त्यामुळे कोणत्या दुकानावरून किती आणि कोणत्या लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले याची प्रत्येक मिनिटाची माहिती वरिष्ठ पातळीवर समजते. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, बायोमेट्रिक पद्धत लागू केलेल्या दुकानांवर दरमहा अन्नधान्य आणि रॉकेलचा काही कोटा शिल्लक राहत आहे. आतापर्यंत रॉकेलचा कोटा कधीही शिल्लक राहत नव्हता. मात्र, मागील महिन्यात १८ दुकानांवर तब्बल २४०० लिटर रॉकेल शिल्लक राहिले आहे. गंगापूर तालुक्यातही लागू करणार सध्या औरंगाबाद शहर आणि फुलंब्री तालुक्यातील १८ दुकानांवर प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्यामुळे लवकरच गंगापूर तालुक्यातील ९ दुकानांवरही बायोमेट्रिक पद्धत लागू केली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.