शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या रेकॉर्ड रूमबाहेर चोवीस तास खडा पहारा

By admin | Updated: February 17, 2015 00:42 IST

औरंगाबाद : वैजापूर उपविभागीय कार्यालयातील रेकॉर्ड रूमला आग लागून त्यातील महत्त्वाचे रेकॉर्ड जळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व तहसीलदारांना

औरंगाबाद : वैजापूर उपविभागीय कार्यालयातील रेकॉर्ड रूमला आग लागून त्यातील महत्त्वाचे रेकॉर्ड जळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व तहसीलदारांना तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. रेकॉर्ड रूमबाहेर शिपाई किंवा होमगार्ड नेमून चोवीस तास पहारा ठेवावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.रविवारी वैजापूर उपविभागीय कार्यालयात रेकॉर्ड रूमला आग लागली. त्यात चारशेहून अधिक संचिका खाक झाल्या. उपविभागीय कार्यालयात जमिनीची ४६० अपील प्रकरणे सुरू होती. यापैकी बहुतेक प्रकरणांचे रेकॉर्ड जळून खाक झाले. त्यामुळे ही आग नक्की लागली की जाणीवपूर्वक लावली गेली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व नऊ तहसील कार्यालये आणि पाच उपविभागीय कार्यालयांतील रेकॉर्ड रूमबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. रेकॉर्ड रूममध्ये जमिनींचे वर्षानुवर्षांचे रेकॉर्ड तसेच इतर महसुली दस्तावेज, जमिनीच्या निवाड्यांची कागदपत्रे असतात. ही कागदपत्रे नष्ट झाल्यास अनेक अडचणी उद्भवू शकतील, ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी रेकॉर्ड रूमबाहेर चोवीस तास पहारा ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. त्यासाठी खास होमगार्ड किंवा शिपाई नेमावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.