शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयाप्रती निष्ठा ठेवा, जिद्द पक्की असू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:01 IST

ध्येयाप्रती निष्ठा ठेवा, मनात जिद्द पक्की असू द्या, अशा शब्दांत उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी महिलांना आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आपण जसा विचार करतो, तसेच घडते’ हा सहा शब्दांचा मंत्र पूर्णपणे आत्मसात करा. हा मंत्र तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो, कारण आपल्या विचारांचा परिणामच आपल्या कृतींवर होत असतो. आपले पाय मागे खेचण्यासाठी इतरांची गरज नसते, तर आपण स्वत:च त्याला कारणीभूत असतो. त्यामुळे आपल्या ध्येयाप्रती निष्ठा ठेवा, मनात जिद्द पक्की असू द्या, अशा शब्दांत उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी महिलांना आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.टाटा टी गोल्ड मिक्स्चर प्रस्तुत ‘लोकमत’ ‘ती’चा गणपती या उपक्रमांतर्गत सोमवारी सायंकाळी प्रोझोन मॉल येथे महिलांसाठी स्पर्धा परीक्षाविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.प्रोझोन मॉल हे या उपक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत. यादरम्यान उपजिल्हाधिकारी धानोरकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षाविषयक भीती दूर केली. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा, अभ्यासक्रम, पूर्व व मुख्य परीक्षेसाठीची तयारी, मुलाखतीची तयारी याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.प्रशासकीय सेवेत काम करण्याची मनापासून इच्छा असेल तरच या मार्गाला या. सगळे करतात म्हणून उगाचच परीक्षा देत बसू नका, पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय परीक्षेला बसू नका, अशी विशेष माहितीही त्यांनी दिली.कोणत्याही परीक्षांसाठी किती तास अभ्यास करावा, याचे कोणतेही नियम ठरलेले नाहीत. त्यामुळे स्वत:च्या क्षमतेनुसार अभ्यास करा. परीक्षेची तयारी ते यश अशा सगळ्याच प्रवासाचा आनंद लुटा, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थिनींना यशाचा राजमार्ग दाखविला. याप्रसंगी राजेश पाटील आणि डिफेन्स करिअर अकॅडमी विद्यार्थिनींची विशेष उपस्थिती होती.सोमवारी सायंकाळी के्रडाईच्या महिला विंगतर्फे ‘ती’च्या गणपतीची आरती करण्यात आली. याप्रसंगी नीता यादव, स्वप्ना बेदमुथा, परिणिता खैरनार, सविता आग्रहारकर, सुरेखा पाटील, अपर्णा अतकरे, हेमा सुखिया, दीपा पठारे, शिल्पा बगडिया, वंदना बगडिया, माधुरी घुटोले, स्नेहा गुप्ता, वैशाली मुनोत यांनी गणरायाची आरती केली.