शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गप्प बसा़़़ अन्यथा चालते व्हा़़!

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

लातूर : पक्षात राहून पक्षातच पर्यायी नेतृत्व तयार करून हवेत गोळीबार करणे ही बाब पक्षविरोधी आहे़

लातूर : पक्षात राहून पक्षातच पर्यायी नेतृत्व तयार करून हवेत गोळीबार करणे ही बाब पक्षविरोधी आहे़ आमच्याकडून कधीच आगळीक होणार नाही़ पण कोणी राजकीयदृष्ट्या आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही बिलकूल खपवून घेणार नाही़ दोस्ती जरूर निभावू पण धमकावत असाल तर आम्ही घाबरण्यापैकी नाही़ आम्ही अन्यायाविरूद्ध डरकाळी फोडणारे वाघच आहोत़ ज्यांना पक्षाच्या विचाराने राहयचे असेल तर गुण्यागोविंदाने रहावे, अन्यथा त्यांनी वेगळी चूल मांडायला काहीच हरकत नाही़ आम्ही दहा चुका सहन करू, पण अकराव्या चुकीला माफी नाही, अशा शब्दात पर्यायी नेतृत्वाची तयारी करणाऱ्यांना दिलीपराव देशमुख यांनी ठणकावले़काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिबीर मंगळवारी हॉटेल कार्निव्हलच्या सभागृहात घेण्यात आले़ ‘मिशन महाराष्ट्र विधानसभा २०१४’ या बॅनरखाली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख बोलत होते़ मंचावर राज्यमंत्री अमित देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष धीरज देशमुख, जि़प़चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, अ‍ॅड़ बी़व्ही़ मोतीपवळे, रेणाचे चेअरमन यशवंत पाटील, मांजराचे चेअरमन धनंजय देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन एस़आऱदेशमुख, आबासाहेब पाटील, जगदीश बावणे, विजय देशमुख, जि़प़चे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड, संतोष देशमुख, प्रतिभा पाटील, पं़स़सभापती मंगलप्रभा घाटगे, नाथसिंह देशमुख, भागवत सोट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, सुनीता आरळीकर, विश्वंभर मुळे आदींची उपस्थिती होती़पर्यायी नेतृत्व करणाऱ्यांचा समाचार घेताना आमदार दिलीपराव देशमुख म्हणाले, आम्ही पक्षाशी आणि नेत्यांच्या विचाराशी प्रामाणिक आहोत़ धमक असणाऱ्यांनी दिल्लीत जाऊन निवडणुकीचं तिकिट जरूर आणावं़ त्यांचा आम्ही प्रामाणिक प्रचार करू़ परंतु, पक्षात राहून एका बाजुला पक्षाची मदत मागायची आणि दुसऱ्या बाजूला पर्यायी समांतर नेतृत्वाची तयारी करायची ही बाब योग्य नाही़ लोकनेते विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर यांचे विचार ज्यांना मान्य असतील त्यांनी पक्षात थांबावं़ अन्यथा वेगळी चूल जरूर मांडावी़ काही लोकांना अशा कारनाम्याची सवयच असते़ माध्यमातून आम्हाला धमकावून काहीही मिळणार नाही़ आम्ही काही वेडेगबाळे नाहीत़ साहेबांच्या रूपाने दहा वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद आमच्याकडे होते़ परंतु, आम्ही कोणाला शब्दाने दुखावले नाही़ धमकावणे तर दूरच़ परंतु, आम्हाला कोणी धमकावणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही़ दहा चुका सहन करू पण अकराव्या चुकीला माफी नाही, अशा कठोर शब्दात आमदार दिलीपराव देशमुख यांनी पर्यायी नेतृत्व करणाऱ्यांना फटकारले़ श्रेष्ठी ठरवेल तो उमेदवार निवडून आणूच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ आमदार वैजनाथ शिंदे, बसवराज पाटील नागराळकर, त्र्यंबकदास झंवर, दत्तात्रय बनसोडे, अ‍ॅड़ बी़व्ही़ मोतीपवळे, माजी आ़ शिवाजीराव पाटील कव्हेकर, धीरज देशमुख, अ‍ॅड़ विक्रम हिप्परकर, यशवंत पाटील, एस़आऱ देशमुख, अ‍ॅड़ त्र्यंबक भिसे आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली़ प्रास्ताविक अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे यांनी केले़ सूत्रसंचालन चंद्रशेखर दंडिमे यांनी केले़ (प्रतिनिधी)जिंकण्यासाठी एकसंघपणे लढूया़़़आतापर्यंतच्या सर्व निवडणुका लोकनेते विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, डॉ़ शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि दिलीपराव देशमुख या कर्तबगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या आणि जिंकल्याही़ यापुढेही याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील़ त्या जिंकण्यासाठी एकसंघपणे लढूया, असे राज्यमंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले़ लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने नाउमेद न होता़ जोमाने कामाला लागू या़ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्याचा लढा आपल्या बुथ व गावातून करावा़ मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतही सौहार्दपूर्ण नाते जुळवून काम करावे़ मागील काळात माझ्याबद्दल काही गैरसमज व अफवा पसरविण्याचे काम हेतू परस्पर केले आहे़ यापुढे अशा अफवा थांबवाव्यात़ ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हक्काने सूचना कराव्यात़ मतभेद असतील तर ते विसरावेत़ मी बदलतोय्, तुम्हीही बदला़ आपण सर्वजण बदलूया आणि जिंकूया, साहेबांच्या विचारांचा सूर्य पुन्हा उगवेल, यासाठी विचाराची ज्योत पेटवूया, अशी भावनिक साद राज्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना घातली़ग्रामीण आणि शहरी आमदारांचे काम उत्कृष्ट़़़लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील दोन्ही आमदारांचे काम अतिशय चांगले आहे़ पक्षाशी प्रामाणिक आणि नेत्यांच्या विचाराशीही प्रामाणिक हे लोकप्रतिनिधी आहेत़ त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष त्यांचा विचार करील़ पर्यायी नेतृत्वाच्या तयारीत असणाऱ्यांनी पक्षाचा आदेश मान्य नसेल तर त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावे़ ज्यांना पक्षात रहायचे नाही, ते गेले तर त्यांचा मार्ग वेगळा, आमचा मार्ग वेगळा, असेही दिलीपराव यावेळी म्हणाले़श्रेष्ठी ठरवतील तो उमेदवाऱ़़धमक असणाऱ्यांनी दिल्लीत जाऊन निवडणुकीचे तिकीट जरूर आणावं़ त्यांचा आम्ही प्रामाणिक प्रचार करू ़ परंतू पक्षात राहून एका बाजूला मदत मागायची आणि दुसऱ्या बाजूला पर्यायी नेतृत्वाची तयारी करायची़ हे चुकीचे आहे़ वास्तविक पाहता श्रेष्ठी ठरवेल तोच उमेदवार असतो़ तो उमेदवार आम्ही निवडून आणू. शहर विधानसभा असो की ग्रामीण विधानसभा़ श्रेष्ठीच उमेदवार ठरवतील़ ज्यांना इच्छा आहे त्यांनी धमक असेल तर दिल्ली गाठावी, असेही दिलीपराव देशमुख म्हणाले़९५ च्या निवडणुकीनंतर डिपॉझिट जप्त झाले होते़़़१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांचा पराभव केल्याची ओळख सांंगणाऱ्यांनी नंतरच्या निवडणुकीत स्वत:चे डिपॉझिट जप्त झाले होते, हे जाहीर सांगावे़ पण हे का सांगितले जात नाही, असा सवाल करीत आमदार दिलीपराव देशमुख यांनी कोणाचेही नाव न घेता पर्यायी नेतृत्वाची तयारी करणाऱ्या काँग्रेसमधील इच्छुकांना ठणकावले़ मीच नेतृत्व करणारआगामी विधानसभा निवडणुकीत मीच नेतृत्व करणार आहे, असेही दिलीपरावांनी ठणकावून सांगितले़