शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पंप हाऊसचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:05 IST

पैठण : पंप हाऊसचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी अखंडित राहण्यासाठी रिंग मेन युनिट यंत्रणा पैठण नगरपरिषदेने कार्यान्वित करून घ्यावी, अशा ...

पैठण : पंप हाऊसचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी अखंडित राहण्यासाठी रिंग मेन युनिट यंत्रणा पैठण नगरपरिषदेने कार्यान्वित करून घ्यावी, अशा सूचना महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक माने यांनी आज तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.

दरम्यान, पंप हाऊसचा विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश माने यांनी महावितरण यंत्रणेला दिले.

पंप हाऊसचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे पैठण शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने रविवारी मध्यरात्री नगराध्यक्ष सुरज लोळगे व नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात जाऊन महावितरण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी महावितरण व न.प. प्रशासनाची मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचताना, केवळ महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा आरोप केला. महावितरणचा विद्युत पुरवठा कधीही खंडित होत असल्याने, शहरात विजेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे शिवसेनेचे गटनेते तुषार पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी पाणीपुरवठा सभापती अजित पगारे, शिवसेनेचे गटनेते तुषार पाटील, राकाँचे गटनेते कल्याण भुकेले, काँग्रेसचे गटनेते हसनोद्दीन कट्‌यारे, नगरसेवक प्रकाश वानोळे, ज्ञानेश घोडके, नगरसेविका पुष्पा वानोळे, कृष्णा मापारी, बंडू आंधळे, विशाल पोहेकर, पाणीपुरवठा निरीक्षक व्यंकटी पापुलवार, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंढे, भगवान कुलकर्णी, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने आदी उपस्थित होते.