शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची माहिती मतदारांपुढे ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:39 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता व निवडणुकीच्या अनुषंगिक बाबींच्या नियमांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज येथे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता व निवडणुकीच्या अनुषंगिक बाबींच्या नियमांचे संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज येथे दिले.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक व जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आढावा बैठक राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनुराधा ढालकरी, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सहारिया म्हणाले, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रामुख्याने उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या माहितीची अचूक तपासणीबरोबर उमेदवार करीत असलेल्या खर्चावरही नजर ठेवावी. त्यासाठी चित्रीकरण करावे व संबंधित विभागाच्या मदतीने पुरावे घ्यावेत. मतदान केंद्राच्या दर्शनी भागावर उमेदवारांची संपत्ती, गुन्हेगारी पार्श्वभूमीवर व इतर माहिती संबंधीचा गोषवारा मोठ्या अक्षरात मतदारांना स्पष्ट दिसेल या स्वरूपात लावावा.मतदार जागृती करताना मतदानाची टक्केवारी वाढविण्यावरही भर द्यावा, मतमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घ्यावी, आदी सूचना त्यांनी दिल्या. आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी संबंधित यत्रणांनी दक्षता घ्यावी. निवडणुकीत कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदारांना मतदान करता यावे अशी व्यवस्था करावी. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समन्वयाने पार पाडावी, असे सांगितले.सचिव शेखर चन्ने यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व मतदारांना व्होटर्स स्लीप वाटप शंभर टक्के करावे. सिंगल विंडो सिस्टीमद्वारे उमेदवारांना आवश्यक परवानगी देणे. तसेच उमेदवार व पक्षांचा निवडणूक खर्चाची माहिती, आचारसंहिता कक्ष, नियंत्रण कक्ष, मतदान केंद्र व्यवस्था, मतदार यादी, मीडिया सेंटर आदींविषयी आढावा घेऊन विविध सूचना त्यांनी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी डोंगरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसंबंधी माहिती दिली तर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. जिल्ह्यात निवडणूक काळातील बंदोबस्ताबाबत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाच्या विविध आदेशांचे संकलन केलेल्या पुस्तिकेचे विमोचन सहारिया यांच्या हस्ते करण्यात आले.