शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

केवड्याचा सुगंध मुंबईपर्यंत

By admin | Updated: September 1, 2014 17:13 IST

गणेशोत्सव सुरू झाला आणि माळीवाड्यातील केवड्याचा सुगंध पुणे-मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला.

औरंगाबाद : गणेशोत्सव सुरू झाला आणि माळीवाड्यातील केवड्याचा सुगंध पुणे-मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला. शहरालगत माळीवाड्यात नागजरी नदीच्या काठी असलेले ‘केवडा बन’ महाराष्ट्रात तिसऱ्या नंबरचे आहे. पूर्वी या परिसरात केवड्याची झाडे १५ हजारांपेक्षा अधिक होती. मात्र, असंतुलित पर्जन्यमान, वाढते प्रदूषण यामुळे या बनात जुनी केवळ ४० झाडे उरली आहेत. महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांतच केवड्याचे तुरळक बन शिल्लक राहिले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील पापनस बन व सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथील केवडा बनाचा समावेश होतो. दौलताबाद किल्ल्यामागील बाजूस असलेले माळीवाडा गाव केवड्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. गावातील नागजरी नदीच्या काठावरील चार एकर जमिनीवर केवड्याची झाडे आहेत. देवगिरी किल्ल्याच्या इतिहासात १३ व्या शतकात यादवांचे राज्य होते. त्यावेळी येथील केवड्यापासून सुवासिक अत्तर केले जात असे. स्वातंत्रपूर्व काळापर्यंत येथे अत्तर बनविले जात होते. तेव्हा नागजरी नदी परिसरात सात एकर शेतात १५ हजारांपेक्षा अधिक झाडे होती. १९७२ च्या दुष्काळात अनेक झाडे वाळली. मागील दशकात दोनदा वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून मोठे नुकसान झाले होते. नदीतील रसायनयुक्त पाण्याचाही परिणाम झाडांवर झाला. मागील १० वर्षांत अनेक झाडे जळून गेली. आजघडीला चार एकर क्षेत्रांत ४० जुनी झाडे तग धरून आहेत. येथील शेतकऱ्यांनी नवीन झाडे लावली. १० वर्षे झाली तरी अजून त्यांना कणसे आली नाहीत.शेतकरी दिलीप गाणार यांनी सांगितले की, केवड्याचे झाड ३० ते ३५ फूट उंच वाढते. या झाडांना वर्षातून एकदाच कणसे येतात. केवड्यात दोन जाती असतात. एककेवडी एक जात असते. यास कणीस नसते व सुगंधही नसतो. दुसरी जातीच्या केवड्यास कणीस असते व त्याला सुगंध असतो. केवडा श्रावणात बहरतो आणि भाद्रपद महिना संपता संपता उतरणीला लागतो. केवड्याच्या एका झाडाला ४०० ते ५०० कणसे येतात. एका केवड्यास १२ ते १५ पाने असतात व तेवढीच छोटी-छोटी कणसे असतात. एक अख्खा केवडा ५०० ते ५५० रुपयांना विक्री होतो. बाजारात येत असलेला केवडा तीन पाने व कणसाचा छोटा तुकडा असलेला असतो. अख्खे कणीस ग्राहकांना पाहावयास मिळतच नाही.