शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादचे दुसरे खासदार ठरले कर्मयोगी स्वामी रामानंद तीर्थ

By शांतीलाल गायकवाड | Updated: April 2, 2019 00:16 IST

हैदराबाद मुक्ती लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य शांताराम सावळाराम मिरजकर या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये जोरदार लढत झाली.

ठळक मुद्देलोकसभेची दुसरी निवडणूक : प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा संघर्ष, पंडित नेहरूंची आमखास मैदानावर सभा

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : साधनसंपत्तीची कमतरता, तंत्रज्ञानाचा अभाव व कमालीची निरक्षरता ही पहिल्या लोकसभा निवडणुकीत असलेली वस्तुस्थिती लोकसभेच्या दुसऱ्या निवडणुकीत तसूभरही बदलली नव्हती. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात हैदराबाद मुक्ती लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य शांताराम सावळाराम मिरजकर या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये जोरदार लढत झाली. काँग्रेस प्रभावाखाली असलेल्या मतदारांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना विजयी केले; परंतु विजयातील अंतर बरेच कमी होते.

स्वामींना मिळाली ७६ हजार २७४ मतेया काळात राज्य तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. लोकसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा, हैदराबाद हे स्वतंत्र राज्य होते. दुसऱ्या निवडणुकीपूर्वीच १९५६ मध्ये आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आकार घेत होती; परंतु मराठवाडा हा हैदराबादलाच जोडलेला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांना उमेदवारी दिली होती, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शांताराम सावळाराम मिरजकर यांना मैदानात उतरविले. २५ फेब्रुवारी १९५७ रोजी औरंगाबाद मतदारसंघात मतदान झाले. मतदारसंघात ३ लाख ७६ हजार ४८ एकूण मतदार होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार ७१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. स्वामीजींना ७६ हजार २७४ मते मिळाली. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ५७.०४ एवढी होती, तर पराभूत झालेले मिरजकर यांना ५७ हजार ४३९ मते अर्थात ४२.९६ टक्के मते मिळाली. पहिल्या लोकसभेत सुरेशचंद्र आर्य यांचा विजय ३५ हजारांहून अधिक मतांनी झाला होता. दुसºया निवडणुकीत काँग्रेसचे हे मताधिक्य घटले.

एकही मत बाद नाही...तेव्हा काही मतदारसंघ एक सदस्यीय, तर काही मतदारसंघ द्विसदस्यीय होते. औरंगाबाद मतदारसंघ सर्वसाधारण होता. त्यामुळे यात एक सदस्य होता. द्विसदस्यीय मतदारसंघात मतदारांना दोन मते करण्याचा अधिकार होता. त्यात अनेक मतदार दोन्ही मतपत्रिका एकाच उमेदवाराच्या मतपेटीत टाकत, त्यामुळे अनेक मते बाद होत असत; परंतु औरंगाबादेत एक सदस्य असल्यामुळे एकही मत बाद झाले नव्हते.पंडित नेहरूंची औरंगाबादेत सभाया निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मराठवाड्याचे सुपुत्र भुजंगराव कुलकर्णी होते. त्यांनीही या निवडणुकीचे अनुभव कथन केले. ते सांगतात, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रचारार्थ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी औरंगाबादेतील आमखास मैदानावर जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर पंडित नेहरू यांनी वेरूळ, औरंगाबाद लेण्यासही भेट दिली.

भुजंगराव कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार, या निवडणुकीत संपूर्ण निवडणूक यंत्रणेकडे केवळ दोन चारचाकी गाड्या होत्या. या दोन गाड्यांच्या मदतीने संपूर्ण मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा हलविली जात होती. मतदान केंद्रांवर मतदान अधिकारी व यंत्रणा एक दिवस अगोदरच बसमधून पाठविली जाई. त्यानंतर प्रशासन व या कर्मचाऱ्यांचा संपर्कही होत नसे.

बैलगाड्या व घरच्या दशम्याजुन्या जाणत्यांनी नागरिकांच्या तोंडून या निवडणुकीतील अनेक कि स्से सांगितले जातात. पूर्वी मतदार स्वत:हूनच मतदान करण्यासाठी येत. त्यासाठी ते स्वत:च्या बैलगाड्या जुंपत. कार्यकर्तेही प्रचारासाठी बैलगाड्या वापरत. तेव्हा प्रचारासाठी सायकली मिळणेही दुरापास्त होते. कार्यकर्ते घरच्या दशम्या घेऊन प्रचारासाठी निघत. साधनसामग्रीची कमतरता व तंत्रज्ञानाची मोठी उणीव असली तरी कार्यकर्ते व मतदारांची निष्ठा आणि प्रामाणिकता मोठी होती.

स्वामीजींचा अल्पपरिचयस्वामी रामानंद तीर्थ ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर यांचा जन्म ३ आॅक्टोबर १९०३ रोजी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी याठिकाणी झाला. उत्कृष्ट संघटक व प्रभावी वक्ते असलेल्या स्वामींचे शिक्षण सोलापूरच्या सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरूकुलात ते कार्यरत होते. येथूनच हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी अनेक कार्यकर्ते, नेते पुढे आले. पुढे अंबाजोगाईत त्यांनी स्वतंत्र शाळा सुरू केली. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली व ते संन्यासी झाले. त्यांनी १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करून हैदराबाद मुक्तिलढ्याचे रणशिंग फुंकले. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेत ते गुलबर्गा येथून काँग्रेसचे खासदार म्हणून संसदेत गेले होते. औरंगाबादेतून दुसºयांदा ते खासदार म्हणून विजयी झाले. ही टर्म संपल्यानंतर त्यांनी नेहरूंची भेट घेऊन राजकारणातून संन्यास घेत संपूर्ण जीवन अध्यात्मासाठी खर्च केले. २२ जानेवारी १९७२ रोजी त्यांचे हैदराबादेत देहावसान झाले.मिरजकरांचा मुंबईत डमी अर्ज१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. हा मतदारसंघ द्विसदस्यीय होता. त्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे यांनीही अर्ज भरला होता. डांगे यांचा डमी उमेदवार म्हणून शांताराम मिरजकर यांनी उमेदवारी दाखल केली होती, जी नंतर मागे घेण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण