शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटल्यात आणखी साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासंदर्भात सुनावणी पूर्ण;  निकाल राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 20:45 IST

औरंगाबाद, दि. 26 - अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून खटल्यात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठीचा अर्ज ...

औरंगाबाद, दि. 26 - अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून खटल्यात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठीचा अर्ज नामंजूर करणा-या सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्धच्या ‘फौजदारी पुनर्निरीक्षण अर्जावरील सुनावणी बुधवारी (२६ जुलै) औरंगाबाद खंडपीठात पूर्ण झाली. न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी प्रकरण निकालासाठी राखून ठेवले. सदर प्रकरणी 3 ऑगस्ट 2017 रोजी पुढील सुनावणी होणार आहे.सत्र न्यायालयात अर्ज    कोपर्डी खटल्यातील आरोपी क्रमांक - 2 संतोष गोरख भवाल(रा. खांडवी, ता. कर्जत) याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून सदर प्रकरणात कोपर्डीच्या घटनेसंदर्भातील टीव्हीवरील बातम्यांची ‘सीडी’ तयार करणारी व्यक्ती, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, सदर खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे संचालक आणि सहायक संचालक तसेच ‘झी-24 तास’ चे संपादक उदय निरगुडकर या बचाव पक्षाच्या सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने 10 जुलै 2017 रोजी त्याचा अर्ज फेटाळला होता. खंडपीठात पुनर्निरीक्षण अर्ज    भवालने खंडपीठात दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जात म्हटले आहे की, वरील महत्त्वाच्या साक्षीदारांमध्ये काही तज्ज्ञ साक्षीदार आहेत. मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले होते. न्यायावैद्यक प्रयोगशाळेचे संचालक आणि सहाय्यक संचालक यांनी वैद्यकीय अहवाल दिले होते. अ‍ॅड. निकम यांनी पोलिसांना कायदेशीर सल्ला दिला होता. निरगुडकर यांनी मुख्यमंत्री, मंत्री विनोद तावडे, भय्यू महाराज आदी नेत्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. याचिकाकर्त्याला कोपर्डी प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे. बचावाच्या संधीसाठी वरील सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड.राकेश राठोड आणि अ‍ॅड. विजयलक्ष्मी खोपडे यांनी केला.  सरकारी पक्षाचा युक्तिवादसरकारपक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, न्यायालयात कोणाचीही साक्ष नोंदावयाची असल्यास त्याचा खटल्यातील घटनेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असणे गरजेचे आहे. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ५ आणि २३३ नुसार कुठल्या साक्षीदाराचा जबाब नोंदवावा याची माणके घालून दिली आहेत. सदर खटल्यात पीडितेच्या व्रणांबाबत अभिप्राय देणारे, तिला मृत घोषित करणारे, तिचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर या सर्व डॉक्टरांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने (आरोपीने) विनंती केलेल्या वरील सहा जणांचा कोपर्डीच्या घटनेशी कुठलाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नाही. याचिकाकर्त्याने केवळ खटला लांबविण्यासाठी कुठलाही तार्किक आधार न देता वरील सहा जणांना साक्षीला बोलावण्याची विनंती केली आहे. न्यायालय हे कुठलाही न्याय निर्णय त्या खटल्यात सादर केलेला पुरावा आणि त्यासाठी नोंदविलेल्या साक्षी अशा कायद्याने विहीत केलेल्या प्रक्रियेने न्याय देते. केवळ काही लोकांनी दिलेले निवेदन किंवा काही राजकीय नेत्यांची वक्तव्याआधारे न्यायालय निर्णय घेत नाही, असे सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळताना निर्णयात स्पष्ट केले आहे. सबब याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळावा, अशी विनंती गिरासे यांनी केली. त्यांनी त्यांच्या युक्तिवादाच्या पुठ्यर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ दिला.वकिलाचा विशेषाधिकार भारतीय पुरावा कायद्याच्या कलम १२६ नुसार एखाद्या वकिलाने त्यांच्या पक्षकाराला काय सल्ला दिला हा त्यांचा ‘विशेषाधिकार’ (प्रेरॉगेटिव्ह) आहे. त्याबद्दल त्यांना कायद्याचे संरक्षण आहे, असे अ‍ॅड. निकम यांना साक्षीसाठी बोलावण्याच्या विनंतीच्या अनुषंगाने अ‍ॅड. गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.