शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड सुपरकिंग, अलॉफ्ट लायमर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:59 IST

एमजीएम येथे सुरू असलेल्या टष्ट्वेवेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत कन्नड सुपरकिंग आणि अलॉफ्ट लायमर संघांनी विजय मिळवला.

औरंगाबाद : एमजीएम येथे सुरू असलेल्या टष्ट्वेवेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत कन्नड सुपरकिंग आणि अलॉफ्ट लायमर संघांनी विजय मिळवला. पहिल्या सामन्यात कन्नडने यंग इलेव्हन ब विरुद्ध २0 षटकांत ७ बाद १८0 धावा केल्या. त्यांच्याकडून स्वप्नील साळवीने ३२ चेंडूंत ५ षटकार व ६ चौकारांसह ७४ व जतीन जोशीने ५१ धावा केल्या. यंग इलेव्हनडकून अतुल वालेकरने ३५ धावांत ५ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यंग इलेव्हन ब संघ १३९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून उदय पांडेने ५६ व संदीप गायकवाडने ५५ धाव केल्या. कन्नडकडून शशी कदमने ३ गडी बाद केले. सलमान अहमद व मनीष राव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुपारच्या सत्रात अलॉफ्ट लायमरने ८ बाद १४६ धावा केल्या. त्यांच्याकडून मोहमद आमेरने ४४ व सय्यद काझीने ३१ धावा केल्या. लकी सी.सी.कडून शेख वसीमने २२ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात लकी सी.सी. संघ ९ बाद ११0 धावापर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून इम्रान पटेलने २७ व वसीमने २४ धावा केल्या. लायमर संघाकडून सय्यद जावेदने ३ गडी बाद केले. सय्यद तल्लाह, अझीम काझी व इम्रान खान यांनी प्रत्येकी २ गडीबाद केले.