शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड-सोयगावच्या सत्ताधारी सेना आमदाराचे रस्ते कामासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:20 IST

कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आ.हर्षवर्धन जाधव यांना सत्तेत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात बुधवारी लाक्षणिक उपोषण करावे लागले. दोन वर्षांपासून मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या निविदा निघत नाहीत. स्थानिक पातळीवर अधीक्षक अभियंता खोटी आश्वासन पत्रे देऊन दिशाभूल करीत आहेत. १२ रस्त्यांच्या कामांना केव्हा मुहूर्त लागणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करून आ.जाधव हे मतदारसंघातील शेकडो नागरिकांसह बांधकाम भवन, स्नेहनगर येथे उपोषणाला बसले होते.

ठळक मुद्देकन्नड-सोयगाव मतदारसंघातील कामे : बांधकाममंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आ.हर्षवर्धन जाधव यांना सत्तेत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात बुधवारी लाक्षणिक उपोषण करावे लागले. दोन वर्षांपासून मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या निविदा निघत नाहीत. स्थानिक पातळीवर अधीक्षक अभियंता खोटी आश्वासन पत्रे देऊन दिशाभूल करीत आहेत. १२ रस्त्यांच्या कामांना केव्हा मुहूर्त लागणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करून आ.जाधव हे मतदारसंघातील शेकडो नागरिकांसह बांधकाम भवन, स्नेहनगर येथे उपोषणाला बसले होते.बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्य अभियंता एम. एम. सुरकुटवार यांच्यामार्फ त अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी आ.जाधव यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी कार्यकारी अभियंता भगत, मुख्य अभियंत्यांचे पीए रेणुकादास कुलकर्णी यांची उपस्थिती होती.आ.जाधव यांनी याच १२ कामांच्या मागणीसाठी मध्यंतरी बांधकाममंत्री पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर आ.जाधव यांनी पाटील यांच्यावर ५ कोटींत भाजप प्रवेशाची आॅफर दिल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. या घटनेला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला; परंतु जाधव यांच्या मतदारसंघातील कामांना सुरुवात होत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. त्या आरोपामुळेच माझी कामे थांबविण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला. कंत्राटदार संघटनेने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता.सासरे सत्तेत तरीही उपोषणआ. जाधव यांचे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे सत्तेतील महत्त्वाचे नेते आहेत. तरीही तुमच्या मतदारसंघात कामे होत नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर ते म्हणाले, सासºयांचे नाव घेऊ नका. त्यांनी धोंडे जेवणासाठी बोलावले तर जाईल. माझे नेते शिवसेना पक्षप्रमुखच आहेत.अधीक्षक अभियंता बोगसअधीक्षक अभियंता चव्हाण ही व्यक्ती बोगस आहे. त्यांची येथून बदली झाली पाहिजे. जिल्ह्यातील खड्डे भरण्याचे काम निकृ ष्ट झाल्याचा आरोप आ. जाधव यांनी केला. मध्यंतरी चव्हाण यांच्या कामांचा भंडाफोड केल्यामुळेच त्यांचा माझ्यावर राग असल्याचे त्यांनी नमूद केले. तर कंत्राटदार संघटनेने चव्हाण हे ‘प्रो’भाजप या धोरणानुसार विभागातील कामांबाबत निर्णय घेत असल्याचा आरोप केला.