औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाच्या (घाटी) अधिष्ठातापदी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची बदली करण्यात आली आहे, तर डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नांदेड येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. म्हस्के आॅगस्ट २०१५ मध्ये रुजू झाले होते. कार्यकाळास दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली करण्यात आली.
‘घाटी’च्या अधिष्ठातापदी कानन येळीकर
By admin | Updated: June 9, 2017 01:05 IST