शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

कामानिमित्त तहसील कार्यालय पुन्हा बहरले

By admin | Updated: July 30, 2015 00:19 IST

जाफराबाद : नागरिकांचे कामे न करता विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या तहसील कार्यालयाच्या कारभाराविषयी लोकमतने केलेल्या स्टिंग आपरेशनचा परिणाम

जाफराबाद : नागरिकांचे कामे न करता विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या तहसील कार्यालयाच्या कारभाराविषयी लोकमतने केलेल्या स्टिंग आपरेशनचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तहसीलदार भाऊसाहेब थोरात प्रशिक्षणार्थी तहसीलदार यांनी कार्यालयीन कामकाज सुरू केले. दरम्यान महसूल विभागाच्या कर्मचारी यांना बोलावून नियमीत हजर राहणाऱ्या व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच कानउघडणी केली. वास्तविक पाहता अधिकारीच हजर नाही तर कामकाज कसे चालणार याची कल्पनाही नसावी म्हणूनच साहेब बोलतात अशी चर्चा तहसिल वर्तुळात ऐकावयास मिळाली. तहसिल कार्यालय प्रमुख नियमित येऊन सुध्दा बदल्यात कर्मचाऱ्यांना एकेरी भाषेत बोलून अवमान करीत असल्याचे कर्मचाऱ्यांत दिसून आले. त्यांच्या या कारभाराविषयी तलाठी संघटना व महसूल संघटना यांनी आक्षेप घेऊन उपविभागीय अधिकारी यांच्यापर्यंत तक्रार गेली आहे. तरी सुध्दा घरचे भांडण घरातच राहावे म्हणून असे अनेक प्रकरणे जागेवरच थांबविली आहे. प्रशिक्षणार्थी, नायब तहसिलदार यांची सुध्दा कामे न करता इतर विषयात अडचण निर्माण करणचे काम करतात. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. एकंदरीत अधिकारी यांच्या या अनागोंदी कारभारामुळे याचा त्रास कर्मचारी व नागरिकांना सहन करावा लागत आहे. लोकमतने केलेल्या स्टिंग आपरेशनच्या दुसऱ्या दिवशी परत तहसिलदार काही कामानिमित्त सकाळी ११ वाजेच्या दरम्यान निघून गेले तर नायब तहसिलदार शाम वाडकर हे ग्राम पंचायत निवडणूक कामात परत कार्यालयाचे दार बंद करून जाऊन बसले. वास्तविक पाहता सर्वसामान्य जनतेच्या सेवे करीता कार्यालये आहेत. परंतु, कार्यालयात कोणीच येऊ नये अशी भूमिका या अधिकाऱ्यांची आहे. तहसिल कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक हा कामानिमित्त, मग याचा त्रास अधिकाऱ्यांना का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी आपल्या सोयीनुसार सुट्टी घेऊन विश्रांती घेतात व इतर कर्मचारी यांची बैैठक मात्र सुट्टीच्या दिवशी मुद्दामहून घेतात. आणि इतर कामासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, कार्यालय कर्मचारी यांची ड्युटी लावण्यात येत असल्याचा प्रकार सुध्या नियमित घडत असल्याचे एका कर्मचाऱ्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पत्रकार कार्यालयात आलाच कसा, इथपर्यंत ह्या अधिकारी विनाकारण कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याचे एकंदरीत चित्र या कार्यालयात दिसून येते. (वार्ताहर)