शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘कमळाबाई’ शिवसेनेचे उपकार विसरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:36 IST

शिवसेनेचे बोट धरून राजकारणात आलेल्या ‘कमळाबाई’चे नखरे वाढले असून, उपकार विसरलेल्या ‘कमळाबाई’चा बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची टीका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव न घेता केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिवसेनेचे बोट धरून राजकारणात आलेल्या ‘कमळाबाई’चे नखरे वाढले असून, उपकार विसरलेल्या ‘कमळाबाई’चा बंदोबस्त करण्याची वेळ आल्याची टीका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांचे नाव न घेता केली. रविवारी सायंकाळी नूतन वसाहतमध्ये आयोजित रमाई स्वर्गरथ लोकार्पण आणि रमाई ग्रुप आणि अल फतेह गु्रपच्या वतीने आयोजित शिवसेनेत जाहीर प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, शहरप्र्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, माजी आ. संतोष सांबरे, भाऊसाहेब घुगे, सुधाकर निकाळजे, अ‍ॅड. भास्कर मगरे, आत्मानंद भक्त, पंडित भुतेकर, बालाजी कल्याणकर, नगरसेवक अशोक पांगारकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.खोतकर म्हणाले की, लोकसभेला शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे तुम्ही चार वेळेस लोकसभेत पोहोचलात. मात्र सत्ता डोक्यात गेल्यामुळे तुम्ही शिवसेनेचे उपकार विसरलात. सेनेच्या वाघावर जाळे टाकणे तुम्हाला महाग पडले. आमचा भाजपाला विरोध नसून त्यांच्या प्रवृत्तीला आहे. ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या डोक्यात सत्ता गेली नाही, मात्र भाजप तीन वर्षात सत्तेची भाषा बोलत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या पक्षाची खिल्ली उडवली जात असल्याचे खोतकर म्हणाले. लवकरच सर्वांना पीआरकार्ड व रमाई घरकुल योजनेचा फायदा मिळवू दिला जाईल. दलित वस्ती योजनेअंतर्गत या भागात विविध विकास कामे करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. अ‍ॅड. बबन मगरे व अ‍ॅड. अशपाक पठाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.