लातूर : बहुचर्चित कल्पना गिरी बलात्कार व खून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून सीबीआयचे पथक लातुरात दाखल झाले आहे़ गुरूवारी या पथकाने कल्पना गिरी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चौकशी केली़ लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी यांचे अपहरण करून बलात्कार व खून करण्यात आला़ याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रारंभी सीआयडीने तपास केला़ कुटुंबियांनी केलेल्या मागणीनुसार आता हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे़ या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी सीबीआयचे तिघांचे पथक दिल्लीहून लातुरात दाखल झाले आहे़ या पथकाचे प्रमुख मनोज पाठक व त्यांचे दोन सहकारी अधिकारी यांच्याकडून सध्याला चौकशी सुरू आहे़ न्यायालयातील कागदपत्र आणि पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रांचीही पाहणी त्यांनी केली आहे़ मराठी भाषेत असलेले कागदपत्र हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरीत करण्याचे काम सध्या सुरू आहे़ याप्रकरणात गिरी कुटुंबियांनी केलेल्या प्रत्येक आरोपाची सखोल चौकशी करण्यात येत आहे़ हे पथक चौकशीनिमित्त लातुरात तळ ठोकून आहे़
कल्पना गिरी खून प्रकरणी सीबीआयकडून चौकशी
By admin | Updated: November 18, 2016 00:49 IST