शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्यात १६ हजार ८३५ कुटुंब शौचालयाविना

By admin | Updated: July 8, 2017 23:41 IST

कळमनुरी : तालुक्यातील १६ हजार ८३५ कुटुंब शौचालयाविना असल्याची माहिती मिळाली आहे.

इलियास शेख । लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतीपैकी केवळ २५ ग्रामपंचायती पाणंदमुक्त झाल्या आहेत. पाणदंमुक्तीसाठी उर्वरित ग्रामपंचायतींना आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून तालुक्यातील १६ हजार ८३५ कुटुंब शौचालयाविना असल्याची माहिती मिळाली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावे पाणंदमुक्त करण्यात येत आहेत. वर्ष २०१२ च्या सर्वेनुसार तालुक्यात ३९ हजार २९७ कुटुंब आहेत. त्यापैकी १९ हजार ९९२ कुटुंबांकडे शौचालये असून त्याचा वापरही सुरू आहे. परंतु, अजूनही १९ हजार ३३५ कुटुंब शौचालयाविना आहेत.त्यापैकी २५०० कुटुंंबांच्या शौचालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. दरम्यान, पाणंदमुक्तीसाठी तालुक्यातील गावांचा समुदाय संचलित पाणंदमुक्तीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शौचालयाचे बांधकाम सुरू आहे.दरम्यान, तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाणंदमुक्तीसाठी आॅक्टोबरअखरेच डेडलाईन देण्यात आली असून नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे, यासाठी गावोगावी दवंडीही पिटण्यात आली आहे.त्याचप्रमाणे विविध गावांत ग्रामसभा घेऊन नागरिकांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले जात असून जनजागृतीही करण्यात आली आहे.आतापर्यंत तालुक्यातील शौचालय बांधकामाची ५१ टक्के काम पूर्ण करण्यात आली असून अजूनही ४९ टक्के कामे शिल्लक आहेत. शौचालय बांधकामाच्या अनुदानापोटी लाभार्थ्यांना १२ हजार रूपये अनुदान देण्यात येत आहे.ग्रामस्तरावरील कर्मचारी व लोकप्रतिनिधींना शौचालय बांधकाम न झालेली कुटुंब दत्तक देण्यात आली असून कर्मचारी व लोकप्रतिनिधी घरोघरी जावून नागरिकांची जनजागृती करत असून त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन देत आहेत.प्रत्येक गावासाठी दत्तक, पालक, संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून सदर अधिकारी महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी नेमून दिलेल्या गावात मुक्कामी राहून नागरिकांशी संपर्क साधून त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत करण्याचे काम करीत आहेत.दरम्यान, तालुक्यातील २० ग्रामपंचायतीत प्रत्येक ५० कुटुंबानीच शौचालय बांधलेले नाही. त्यांना ३१ मे २०१७ पर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. परंतु, ज्यांनी दिलेल्या कालावधीत शौचालयाची कामे पूर्ण केली नाहीत, अशा ग्रामपंचायतींना आता पुन्हा एकदा आॅक्टोबरपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे.आॅक्टोबरपर्यंत शौचालयाचे उद्दीष्ट न झाल्यास संबंधित गावचे ग्रामसेवक, पालक, संपर्क अधिकारी व दत्तक अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे.