शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘कुटुंबकल्याण’चे ‘टाके’ ढिलेच !

By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST

संजय तिपाले , बीड कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचे आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न असतात; परंतु मागील वर्षी १३ शस्त्रक्रिया चक्क ‘फेल’ ठरल्या आहेत़

संजय तिपाले , बीड कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचे आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न असतात; परंतु मागील वर्षी १३ शस्त्रक्रिया चक्क ‘फेल’ ठरल्या आहेत़ आरोग्य विभागाकडून आता या सर्व मातांना प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे भरपाई दिली जाणार आहे़ ‘छोटे कुटंब- सुखी कुटुंब’ असा संदेश देऊन लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाकडून कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात़ त्यानुसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांमध्ये कुटुंबकल्याण शिबिरे आयोजित केली जातात़ गतवर्षी जिल्ह्यात १५ हजार कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आले होते़ प्रत्यक्षात उद्दिष्टापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या़ मात्र, शस्त्रक्रिया केल्यानंतरही १३ मातांना गर्भधारणा झाली़ त्यामुळे त्यांना कुटुंबकल्याण नुकसान भरपाई योजनेंतर्गत प्रत्येकी ३० हजार रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जाणार आहे़ पूर्वी हे प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यस्तरावरील विमा कंपन्यांकडे जात होते़ यावर्षीपासून मात्र, जिल्हा स्तरावरुनच भरपाई मिळणार आहे़ जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षेतखालील गुणवत्ता अभिवचन समिती या प्रस्तावांना मंजुरी देणार आहे़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शस्त्रक्रिया ‘फेल’ झालेल्या मातांना भरपाई मिळावी म्हणून प्रस्ताव तयार केले आहेत़ हे प्रस्ताव गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी सांगितले़ प्रस्तावांना मंजुरी मिळताच भरपाईची रक्कम संबंधितांना वाटप करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले़ माता मृत्यूनंतर दोन लाखांची भरपाई कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ‘फेल’ ठरली तर अनावश्यक गर्भधारणा होते़ त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते़ अनावश्यक प्रसूतीवेळी मातेचा मृत्यू झाला तर दोन लाख रुपये इतकी भरपाई दिली जाते़ राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी निधीची तरतूद केली जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ असफल शस्त्रक्रिया तालुकाप्रस्ताव केज २ पाटोदा२ माजलगाव २ परळी २ बीड १ अंबाजोगाई २ धारुर२ एकूण१३