शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

कचनेर यात्रेस ध्वजारोहणाने सुरुवात

By admin | Updated: November 6, 2014 01:37 IST

महावीर पांडे , कचनेर श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर यात्रा महोत्सवास बुधवारी मुख्य ध्वजारोहण करून मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली.

महावीर पांडे , कचनेरश्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर यात्रा महोत्सवास बुधवारी मुख्य ध्वजारोहण करून मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली. ध्वजारोहण औरंगाबाद निवासी फुलचंद मनोजकुमार दगडा परिवारातर्फे करण्यात आले. या मंगलमयी प्रसंगी प. पूज्य उपाध्याय मनमितसागरजी महाराज, प. पूज्य मुनिश्री संयमसागरजी महाराज, मुनिश्री प्रसन्न चंद्रमुनी महाराज, प. पूज्य आर्यिका आगमती माताजी यांची उपस्थिती होती.याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष माणिकचंदजी गंगवाल, विश्वस्त सुरेशकुमार कासलीवाल, क्षेत्राचे सहसचिव मनोज साहुजी, नितीन गंगवाल, अशोक अजमेरा, किरण मास्ट, नरेंद्र अजमेरा, विश्वस्त केशरीलाल जैन, नीलेश काला, विनोद पाटणी, नीलेश काला, मुख्य पूजारी जैन मंदिर रामदास जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. १० वाजता भगवंतांच्या अभिषेकाची बोली होऊन मूलनायक श्री चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक करण्यात आला. इंद्र-इंद्रायणीची बोली नाभिराज परसोबा मास्ट, जलाभिषेकची बोली पवनकुमार नाना लालजी गांधी (इंदोर), तीर्थरक्षक बोली/ संतोष श्रीपाल पुरणजळकर (हिंगोली), शांतीधाराची बोली सूरजमलजी राजेंद्रकुमार गंगवाल (शिर्डी) यांनी घेतली. तीन दिवशीय यात्रा महोत्सवासाठी देशभरातून व राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित झाले आहेत.परभणी, जिंतूर, औरंगाबाद, नाशिक, कोपरगाव, श्रीरामपूर, जळगाव, अमळनेर, भुसावळ, श्रीरामपूरसह राज्याच्या काना-कोपऱ्यातून पायी यात्रेकरूंच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. पायी यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी नाश्ता, चहाची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे शासकीय स्तरावर पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, विद्युत मंडळ, एस.टी. महामंडळ, अग्निशामक दल, बांधकाम विभाग यांनी यात्रेच्या काळात चोख व्यवस्था ठेवली. पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात यांच्यासह नऊ पोलीस अधिकारी, ९० पुरुष पोलीस कर्मचारी, १८ महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त येथे आहे. भक्तिमय व संगीतमय वातावरणात अभिषेक करण्यात आला. हिंगोली ते कचनेर पदयात्रेकरूंचा यावेळी संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. २४० कि़मी. अंतर या यात्रेकरूंनी ७ दिवसांत पूर्ण केले. संघप्रमुख उदय सोवितकर हे आहेत. अभिषेक सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचे वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसादाच्या वेळेस अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून औरंगाबाद येथील अरुणा ठोळे, मंजू पाटणी, नीलिमा ठोळे, कविता अजमेरा, पुष्पा ठोळे, लताबाई गंगवाल, प्रेमा लोहाडे, किरण पांडे, शांताबाई गंगवाल व हडको येथील महिला मंडळ जातीने लक्ष ठेवून होते. यात्रा यशस्वीतेसाठी विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ, जैन मंदिराचे कर्मचारी वृंद प्रयत्नशील आहेत. कचनेर : श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे बुधवारी यात्रा महोत्सवानिमित्त राज्याचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा क्षेत्राच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दर्डा यांनी यात्रा महोत्सवाबद्दल माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून महिला मंडळाने घेतलेल्या मेहनतीची त्यांनी प्रशंसा केली. ४राजेंद्र दर्डा यांच्यासोबत पंकज फुलपगर, जी.एम. बोथरा, आ. संजय पाटील बेळगाव (कर्नाटक) यांचाही सत्कार करण्यात आला. ४याप्रसंगी विश्वस्त माणिकचंदजी गंगवाल, सुरेश कासलीवाल, भरत ठोळे, मनोज साहुजी, किरण मास्ट, बिपीन कासलीवाल, नीलेश काला, नितीन गंगवाल, प्रमोद कासलीवाल व कचनेर क्षेत्राचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.