शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरातील रस्त्याच्या कामाबद्दल खंडपीठाची सक्त नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:10 IST

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाने गेल्यावर्षी १०० कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेशिवाय रस्त्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरूच झाले नाही.

ठळक मुद्देखंडपीठाचा इशारा : २ नोव्हेंबरपर्यंत रस्त्याच्या कामात प्रगती झाली नाही, तर निधी परत जाईल

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाने गेल्यावर्षी १०० कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. मात्र, निविदा प्रक्रियेशिवाय रस्त्याचे काम अद्याप प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. महापालिकेने २ नोव्हेंबरपर्यंत शहरातील रस्त्याच्या कामांची प्रगती दाखविली नाही, तर शासन तो निधी परत घेऊ शकेल, अशा शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. न्या. टी.व्ही. नलावडे आणि न्या. व्ही.व्ही. कंकणवाडी यांच्या खंडपीठात या जनहित याचिकेवर बुधवारी (दि.२४) सुनावणी झाली. पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे.तसेच रेल्वेच्या नांदेड विभागाच्या उपमुख्य अभियंत्यांनी २ नोव्हेंबर रोजी व्यक्तिश: सुनावणीस हजर राहावे, असे निर्देशही खंडपीठाने दिले. रेल्वे विभागाने गोलवाडी येथील ‘फोर लेन’ उड्डाणपुलाच्या बांधकामाचा अंतिम नकाशा (जीएडी) सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावा, बांधकाम विभागाने दोन दिवसांत त्या नकाशाला मंजुरी देण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले.आकाशवाणी येथील उड्डाणपूल आणि विमानतळासमोरील भुयारी मार्गाच्या २०० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामांना दिल्ली येथील राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापकांनी २ नोव्हेंबरपर्यंत परवानगी देण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले.२०१४ साली शहरातील १५ रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटींचा निधी आला होता. ही कामे आठ महिन्यांत पूर्ण करावयाची होती; परंतु चार वर्षांत कुठेही ‘झेब्रा क्रॉसिंग’ किंवा ‘लेन मार्किंग’ केले नसल्याचे याचिकाकर्ता अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले असता एक महिन्यात ही कामे पूर्ण करण्याचेही निर्देश खंडपीठाने दिले. शहरातील रस्त्यांवरील दुभाजक (डिव्हायडर) पेट्रोलपंपांसमोर तसेच ठिकठिकाणी तोडले असून, त्यातून दुचाकी आणि लोक ये-जा करतात. त्यामुळे अनेक अपघात होतात. याबाबत पोलीस यंत्रणा आणि महापालिकेने गांभीर्याने कारवाई करणे जरूरी आहे, असेही मत खंडपीठाने व्यक्त केले. महावीर चौक ते विमानतळापर्यंतच्या रस्त्याचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे यावेळी खंडपीठास सांगण्यात आले.याचिकाकर्ता अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी आपली बाजू मांडली, तर महापालिकेतर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, रेल्वेतर्फे अ‍ॅड. मनीष नावंदर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे व अ‍ॅड. नेरलीकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकCourtन्यायालय