शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फक्त एक पाऊल़़ वंचितांच्या आनंदासाठी

By admin | Updated: March 18, 2016 00:17 IST

भारत दाढेल, नांदेड कळले तुझ्या डोळ्यात, मज दु:खाची आसवे, हसले खुदकुन चेहरे, अन ओझे झाले हलके़़़़

भारत दाढेल, नांदेडकळले तुझ्या डोळ्यात, मज दु:खाची आसवे, हसले खुदकुन चेहरे, अन ओझे झाले हलके़़़़या काव्यपंक्ती प्रमाणे वंचितांच्या चेहऱ्यावर क्षणभर हास्य फुलविण्यासाठी फेसबुकच्या जस्ट वन स्टेप या ग्रुपच्या तरूणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नांदेड शहरात मागील दोन महिन्यांपासून काम हाती घेतले आहे़ शहरात गोरगरीब, बसस्थानक, रेल्वेस्थानक या परिसरात फिरणारे अपंग भिक्षुक, वेडसर व्यक्ती, फुटपाथवरील झोपणारे वृद्ध, अंध विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी जस्ट वन स्टेपचे सदस्य रात्री, बेरात्री फिरून त्यांच्या गरजा भागविण्याचे काम करत आहेत़ यासाठी कोणते तरी निमित्त शोधून तो खर्च या कामासाठी वळविण्यात येत आहे़ ग्रुपमधील सदस्यांचे वाढदिवस असो की कोणाच्या घरी एखादा कार्यक्रम असो़़़ हा सोहळा साजरा करण्यासाठी होणारा खर्च गोरगरीबांच्या मदतीसाठी केला जात आहे़ प्रत्येक सदस्य या कामासाठी आर्थिक मदत करतो़ त्यातुन जमा होणारी रक्कम ही सामाजिक कार्यासाठी खर्च केला जातो. मागील दोन महिन्यापासून हा उपक्रम नांदेड शहरात राबविण्यात येत आहे़ यासंदर्भात जस्ट वन स्टेप ग्रुपचे सदस्य मंत्रीनगर येथे राहणारे प्रशांत सावंत म्हणाले, वंचितांसाठी काही तरी करावे, यासाठी मागील तीन, चार महिन्यांपासून विचार करत होतो़ मग फेसबुकद्वारे ही संकल्पना मित्रांना सांगितली़ दहा मित्र तयार झाले़ त्यांनी मदतीचा हात पुढे केला़ आणि मग जस्ट वन स्टेप या नावाने ग्रुप तयार करून जानेवारीत कामाला सुरूवात केली़ थंडीचे दिवस असल्याने रेल्वेस्थानक, बसस्थानक, फुटपाथवर झोपणाऱ्या गोरगरिबांच्या अंगावर उबदार कपडे टाकण्याचा विचार आला़ आणि सर्व मित्रांनी ही योजना अंमलात आणली़ यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे फुललेले हास्य आमच्यासाठी उर्जास्त्रोत बनले़ आम्हाला आणखी बळ मिळाले़ त्यानंतर मित्राच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च आम्ही याकामी खर्च करण्याचे ठरविले़ अन्न शिजवून ते पाकिटात भरले़ त्यानंतर पोटासाठी वणवण हिंडणारे भिक्षुक तसेच अपंग, वृद्धांना हे अन्न वाटप केले़ हे करताना आम्हालाही खुप समाधान वाटले़त्यानंतर आमच्या ग्रुपचे सदस्य संख्या हळूहळू वाढू लागली़ वसरणी येथील अंध विद्यालयातही असाच उपक्रम राबविण्यात आला़ त्याठिकाणी संगीत साहित्य नादुरूस्त होते़ आम्ही सर्वांनी यासाठी लागणार खर्च जमा करून तो या साहित्याची दुरूस्ती करण्यासाठी दिली़