शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध होण्याचे नुसतेच सोंगढोंग

By admin | Updated: September 11, 2016 01:22 IST

औरंगाबाद : बौद्ध होणे ही साधी गोष्ट नाही. लोकांनी इथे गाड्या आणि घरांना त्यावर नाव लिहून बौद्ध बनविले; पण घरातील माणसं मात्र बौद्ध झाली नाहीत.

औरंगाबाद : बौद्ध होणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी सदाचारी बनावे लागते. वाईट गोष्टीचा त्याग करावा लागतो. लोकांनी इथे गाड्या आणि घरांना त्यावर नाव लिहून बौद्ध बनविले; पण घरातील माणसं मात्र बौद्ध झाली नाहीत. आम्ही बौद्ध असल्याची नुसती सोंगढोंगच करीत आहोत, अशी खंत भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.अनिलकुमार सोनकामळे लिखित ‘दलित नही, बौद्ध कहो’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अशोक कांबळे होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. अरविंद गायकवाड, प्रसिद्ध कवी प्रतापसिंग बोदडे, बौद्ध महासभेचे अ‍ॅड. एस. आर. बोदडे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. विशुद्धानंद बोधी म्हणाले, गेल्या ३६ वर्षांपासून मी बौद्ध बनविण्याच्या प्रक्रियेत स्वत:ला वाहून घेतले आहे. तरीही इथल्या लोकांना मी अजून बौद्ध बनवू शकलो नाही ही माझ्यासाठी शोकांतिका आहे. इथे लोकांनी गाड्या, घरांना बौद्ध बनविले. घरांना सम्यक नाव दिले; पण स्वत: बुद्धाचे आचरण केलेले नाही. आम्ही नुसते सोंगढोंग करतो आहोत. गाडीवर बौद्ध असल्याचे लिहितो, पण त्याच गाडीवर बसून जाताना जर एखाद्याने ओव्हरटेक केले तर लगेच त्याला शिवी हासडतो. मग आम्ही बौद्ध कसे. आम्ही स्वत:ला बुद्धाचे, आंबेडकरांचे अनुयायी म्हणतो आणि दुसरीकडे खा, प्या, मजा करा अशा पद्धतीने जगतो आहोत. जयभीम बोलो आणि कही भी चलो असे आमचे वागणे सुरू आहे. हे बदलले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. तत्पूर्वी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दलित नही बौद्ध कहो या पुस्तकावर भाष्य केले. दलित ही त्याज्य असलेली ओळख झुगारून बौद्ध अशी नवीन ओळख करून देण्याचा महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकात मांडला आहे. परंतु केवळ अशी ओळख करून देऊन चालणार नाही तर ते करताना बौद्ध बनविण्याची प्रक्रिया आणखी एक पाऊल पुढे आली पाहिजे. बौद्ध समाज परिवर्तनाच्या चळवळीत वेगाने पुढे जात आहे, असेही डॉ. गायकवाड म्हणाले. यावेळी प्रतापसिंग बोदडे यांनी आपण आपल्या लेखनात यापुढे दलित हा शब्द वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीला लेखक अनिलकुमार सोनकामळे यांनी दलित हा शब्द असंवैधानिक असून तो बाबासाहेबांनाही पसंत नव्हता. हा शब्द त्याज्य किंवा कमी लेखणारा आहे. त्यामुळे मागासवर्गीयांनी यापुढे दलित अशी ओळख करून देऊ नये, असे आवाहन केले.