शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लिक्विड ऑक्सिजन निर्मिती प्लांट घोषणेपुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावाने रौद्ररुप धारण केले असून, गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, ऑक्सिजनसाठी धावाधाव ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावाने रौद्ररुप धारण केले असून, गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. परिणामी, ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागत आहे. गतवर्षी लिक्विड ऑक्सिजन निर्मिती प्लांटची घोषणा करण्यात आली; परंतु वर्षभरातही औरंगाबादेत ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभा राहू शकला नाही. त्यामुळेच रुग्णांचा श्वास गुदमरण्याची वेळ ओढावत आहे. या प्लांटच्या उभारणीकडे दुर्लक्ष करून पुरवठादारांनाच एकप्रकारे ‘ऑक्सिजन’ पुरविले जात असल्याची टीका लोकप्रतिनिधींकडून होत आहे.

मराठवाड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे औरंगाबादसह जालन्यात लवकरच ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारण्यात येईल, असे जाहीर करून त्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांना आवाहनही केले. पुणे, रायगड, ठाणे, नागपूर या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प असल्याने मराठवाड्यापर्यंत ऑक्सिजनच्या वाहतुकीत बराच वेळ जातो. संपूर्ण राज्य ४५० किमीच्या परिघात आहे. त्यामुळे औरंगाबादच्या प्रकल्पातून महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होईल. १०० ते २०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन निर्मिती या प्रकल्पातून होईल, असे सांगण्यात आले. प्रकल्प उभारणाऱ्या काही उद्योजकांशी चर्चा करण्यात आली. त्यातील दोन उद्योजकांनी औरंगाबाद आणि जालन्याला पसंती दिली. तातडीने सर्व परवानग्या मिळाव्यात, अशी अट उद्योजकांनी टाकली; परंतु प्रत्यक्षात पुढे काही झाले नाही. घोषणा करणाऱ्या मंत्र्यांसह आणि प्रशासनाला या प्लांटचा विसर पडला. रुग्णालयांत ऑक्सिजन टँक उभारण्यात येत आहे. त्यात पुरवठादारांकडून लिक्विड ऑक्सिजन पुरविण्याशिवाय काहीही केले जात नसल्याने ऑक्सिजनसाठी रुग्णांचा जीव जाण्याची वेळ ओढावत असल्याची ओरड होत आहे.

औरंगाबादेत कुठून होतो पुरवठा

चाकण-पुणे, रायगड, ठाणे यासह औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पुरवठादारांकडून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. या ऑक्सिजन टँक आणि सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविले जाते.

----

शासकीय रुग्णालयांची स्थिती

महापालिकेचे मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटर येथे रोज साधारण ६० ते ७० सिलिंडरद्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरविले जाते. या सेंटरसाठी लिक्विड ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरच सुरू होणार आहे, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले, तर जिल्हा रुग्णालयात रोज साधारण २० सिलिंडर लागत आहेत. येथे लिक्विड ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू असून, ५ दिवसांत काम संपेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. घाटीत आजघडीला ७ ऑक्सिजन टँक आहेत. एक ऑक्सिजन टँकर कायम रुग्णालयाचा आवारात उभा करावा लागत आहे.

----

- रोज सध्या लागणारा ऑक्सिजन- ५० ते ५५ टन

- साधारण १८ रुपये पर क्युबिक मीटर ऑक्सिजनचा दर (औषध प्रशासन)

---

पुरवठादारांचे प्रेशर आहे का?

पालकमंत्री घोषणा करतात; परंतु त्यानंतरही प्लांट झालेला नाही. याला कोणीतरी जबाबदार आहे की नाही. जो ऑक्सिजन पुरवितो, त्याचे काही प्रेशर आहे का, सगळ्यांना ऑक्सिजन पुरवितो, कशाला प्लांट काढता, असे म्हटले जात आहे. हा प्लांट झाल्यास सर्व शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविता येईल. वाहतुकीत वेळ जाणार नाही. अधिक पैसेही मोजावे लागणार नाही. खासगीकडून न घेता आपण स्वत:चा ऑक्सिजन का पुरवित नाही, पण घोषणा करूनही काही होत नाही.

-खा. इम्तियाज जलील

---

सध्याच्या पुरवठादाराला सुरक्षा देताहेत

ऑक्सिजन प्लांट मागील एप्रिलमध्ये मंजूर झाला. त्याला लावायला एक वर्षे उलटत आहे. सध्या जो ऑक्सिजन पुरवठा करतो, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठीच वेळ लागत आहे. ४० दिवसांत प्लांट उभारणे शक्य आहे. त्यात कोणतेही छुपे तंत्र नाही. मेल्ट्राॅन येथे प्लांट झाल्यास रुग्णांना फायदा होईल.

- आ. अतुल सावे