डॉ.गंगाधर वाळले लिखित ‘गुरूंचे गुरुत्व’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त दि. ३१ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.भापकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण संचालक दिनकर टेमकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लघूला गुरू करतो तो गुरू, अशा शब्दांत न्या.जोशी यांनी गुरूची व्याख्या सांगितली, तर प्रत्येक क्षणी प्रत्येकाकडून शिकणे हेच गुरुत्व आहे. गुरूचे गुरुत्व हे सर्वश्रेष्ठ असते, असे मत टेमकर यांनी मांडले. ऑनलाइन माध्यमातून अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
जय घाटनांद्रेकर यांनी जय साहित्य प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. अश्विनी जगताप आणि डॉ.रेवणनाथ पवार यांनी संचालन केले. प्रथमेश महाजन व नंदिनी महाजन यांनी स्वागतगीत गायले, तर अमृता घाटनांद्रेकर आणि शाश्वत कुलकर्णी यांनी शारदास्तवन म्हटले. अक्षय वाळले यांनी आभार मानले.
फोटो ओळ :
डॉ.गंगाधर वाळले लिखित ‘गुरूंचे गुरुत्व’ पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ.पुरुषोत्तम भापकर, जय घाटनांद्रेकर.