शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मातेची लेकीसह रेल्वेसमोर उडी

By admin | Updated: August 17, 2016 00:57 IST

औरंगाबाद : कार खरेदीसाठी माहेरहून पैसे आणत नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचाला वैतागून एका विवाहितेने आपल्या

औरंगाबाद : कार खरेदीसाठी माहेरहून पैसे आणत नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचाला वैतागून एका विवाहितेने आपल्या दोनवर्षीय चिमुकलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे रुळाजवळ उघडकीस आली.वैशाली महेश सिल्लोडकर (२५, रा. ११ वी योजना, शिवाजीनगर) व इशिका (२) असे या माय-लेकीचे नाव आहे. वैशालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा महेश सिल्लोडकर, सासरा संतोष सिल्लोडकर व सासू, अशा तीन आरोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मूळ जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील वैशालीचा विवाह २०१३ मध्ये शिवाजीनगरातील महेश सिल्लोडकरसोबत झाला होता. लग्नानंतर वर्षभर सासरच्या मंडळींनी तिला गुण्यागोविंदाने नांदविले. त्यानंतर मात्र किरकोळ कारणावरून सासरच्या मंडळींनी वाद उकरून काढत वैशालीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला सासरची ही मंडळी चक्क उपाशीपोटी ठेवू लागली. शिवीगाळ, मारहाण करू लागली. गेल्या काही महिन्यांपासून तर त्यांनी पैशांसाठी वैशालीच्या मागे तगादा लावला. आरोपी महेशला कार खरेदी करायची होती. इकडे वैशाली मुलीसह घरातून गायब झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी फोन करून ती तिकडे आली का, अशी विचारणा केली. संशय आल्याने माहेरच्या मंडळींनी औरंगाबाद गाठले. सोमवारी सकाळी रेल्वे रुळावर या माय-लेकीचे प्रेत सापडले. वैशालीचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू आहे, याची माहेरच्यांना कल्पना होती. त्यांच्या जाचाला वैतागूनच तिने आत्महत्या केली, हे लक्षात आल्यानंतर वैशालीचे वडील रघुनाथ प्रजापती यांनी पुंडलिकनगर ठाण्यात फिर्याद दिली. फौजदार सचिन मिरधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवरा महेश, सासरा संतोष व सासूला अटक केली.