शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार न्यायपालिकेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:15 IST

संसदेने कायदा मंजूर केल्यानंतर त्या कायद्याचा सदसद्विवेकबुद्धीने अर्थ लावत संबंधितांना न्याय देण्याचा अधिकार न्यायपालिकेचा आहे. यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. केवळ या कायद्याची योग्यरीत्या अंमलबजावणी करता यावी, यासाठी परिनियम (स्टॅट्यूट) बनविण्यात येतात,

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संसदेने कायदा मंजूर केल्यानंतर त्या कायद्याचा सदसद्विवेकबुद्धीने अर्थ लावत संबंधितांना न्याय देण्याचा अधिकार न्यायपालिकेचा आहे. यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. केवळ या कायद्याची योग्यरीत्या अंमलबजावणी करता यावी, यासाठी परिनियम (स्टॅट्यूट) बनविण्यात येतात, या परिनियमांनाही राष्ट्रपतींची मंजुरी घेतलेली असते, अशी माहिती केंद्र सरकारच्या विधि व न्यायमंत्रालयाचे सचिव डॉ. जी. नारायणा राजू यांनी दिली.महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात पहिल्यांदाच ‘लॉ मेकिंग प्रोसेस अ‍ॅण्ड इंटरपिटेशन आॅफ द स्टॅट्यूट’ या विषयावर केंद्रीय विधि व न्याय विभागाचे सचिव डॉ. जी. नारायणा राजू यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश होते. प्राचार्या डॉ. संजीवनी मुळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. राजू यांनी कायद्याची निर्मिती प्रक्रियाच विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवली. संसदेत कायदा मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे जातो. त्यावर राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात येतो. गॅझेटमध्ये प्रकाशित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांकडून करण्यात येते. मात्र, कोणावर अन्याय होत असेल, तर त्याविषयी न्यायालयात दाद मागता येते. तेव्हा न्यायाधीश संबंधित व्यक्तीला न्याय देताना आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून कायद्याचा अर्थ लावून न्याय देत असतात. हा अधिकार न्यायाधीशांचा असतो. त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. सूत्रसंचालन प्रा. अशोक वडजे यांनी केले.