शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सखी संगे लुटा सहलीचा आनंद

By admin | Updated: June 7, 2016 23:50 IST

औरंगाबाद : कुटुंबाची चिंता बाजूला ठेवून एक दिवस आपल्या लाडक्या सखींसोबत जर केशरबागेत मनसोक्त बागडायला मिळाले

औरंगाबाद : कुटुंबाची चिंता बाजूला ठेवून एक दिवस आपल्या लाडक्या सखींसोबत जर केशरबागेत मनसोक्त बागडायला मिळाले तर काय बहार येईल ना? चला तर मग; लवकर अधिक विचार करण्यात वेळ न दवडता चटकन या सहलीच्या तयारीला लागा. लोकमत सखी मंचच्या वतीने खास तुमच्यासाठी या धमाल एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.केवळ आंब्याच्या बागेत मनसोक्त फिरणे, एवढ्यावरच ही सहल थांबत नाही. रेन डान्स, मिनी ट्रेनचा प्रवास, झाडांच्या सावलीत बसून सखींसोबत केलेले वनभोजन आणि खूप काही आव्हानात्मक खेळ या सगळ्या गमतीदार गोष्टींचा अनुभव या सहलीतून तुम्हाला मिळणार आहे. शिवाय मनसोक्त बागडून दमल्यावर आमरस आणि पुरणपोळीवर यथेच्छ ताव मारण्याचा आनंद काही वेगळाच. चला तर मग, वाट कशाची बघताय? लवकरात लवकर तुमच्या सखींना फोन करा आणि सर्व जणी मिळून या सदाबहार सहलीचा आनंद लुटा. सखी मंच सदस्यांव्यतिरिक्त इतर मैत्रिणीही या धमाल सहलीचा आनंद लुटू शकतात. मर्यादित जागा असल्यामुळे लवकर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. दि. ११ जून, शनिवार रोजी केशरबाग, सावता माळीनगर, सिन्नर, घोटी रोड येथे ही सहल नेण्यात येणार आहे. सखी मंच सदस्यांसाठी सहल शुल्क रु. १५०० तर इतर महिलांसाठी रु. १८०० असेल. या सहल शुल्कात चहा, नाश्ता, जेवण या सर्व बाबींचा समावेश असेल. लहान मुलांना प्रवेश नाही. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद या ठिकाणी संपर्क साधावा किंवा ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क करावा. ०२४०- २४८५३०१-०४ या क्रमांकावरही तुम्ही संपर्क करू शकता.