शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार ते आमदारापर्यंतचा प्रवास!

By admin | Updated: October 22, 2014 01:21 IST

औरंगाबाद : पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना राजकीय मंडळींसोबत अनेकांचा घनिष्ठ संबंध येतो.

औरंगाबाद : पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना राजकीय मंडळींसोबत अनेकांचा घनिष्ठ संबंध येतो. या संबंधातून अनेकजण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतात; पण यश प्रत्येकाच्या पदरी पडत नाही. तब्बल २२ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज जलील यांनी अचानकपणे नोकरीला सोडचिठ्ठी देत आपली कर्मभूमी असलेल्या औरंगाबादेतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अवघ्या एक महिन्यातील त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांनी घवघवीत यशही संपादन केले हे विशेष.इम्तियाज जलील यांचा जन्म औरंगाबादचा. मौलाना आझाद महाविद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी आपले करिअर पत्रकारितेत करण्याचा निर्णय घेतला. ‘लोकमत’टाईम्समध्ये त्यांनी तब्बल १२ वर्षे काम केले. त्यानंतर ‘एनडीटीव्ही’या वृत्त वाहिनीत त्यांनी पुण्यात वरिष्ठ पत्रकार म्हणून काम सुरू केले. या ठिकाणीही १२ वर्षे काम केल्यावर अचानक नोकरीला सोडचिठ्ठी दिली. मागील महिन्यात २० सप्टेंबरला त्यांनी औरंगाबाद गाठले. मित्र परिवाराला त्यांनी सांगितले की, मी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. विनोदी प्रवृत्ती, हजरजवाबीपणा हे त्यांचे वैशिष्ट्ये राहिल्याने सुरुवातीला मित्रांना वाटले की, हा चेष्टा करीत आहे. त्याने मित्रांना सांगितले की, मी मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनकडून (एमआयएम) निवडणूक लढविणार आहे.एमआयएम या नवख्या पक्षाची औरंगाबादेत काय डाळ शिजेल, दिग्गज आणि मातब्बर उमेदवारांसमोर आपला काय निभाव लागेल. निवडणुकीसाठी किती कोटी लागतील, असे अनेक अंदाज बांधत मित्रपरिवाराने त्यांना या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. मात्र, इम्तियाज यांचा इरादा आणि मनसुबे अटळ होते. ते इंचभरही मागे हटले नाहीत. २५ सप्टेंबर रोजी त्यांनी एमआयएमकडून उमेदवारी अर्जही दाखल केला. १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले तेव्हा तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मतदान केले. १९ रोजी मतपेट्या उघडल्या तेव्हा जनतेने कौल पत्रकार इम्तियाज जलील यांच्या पारड्यात टाकला होता.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये मतदारसंघ प्रचाराच्या निमित्ताने ढवळून काढला. आबालवृद्धांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसादही मिळू लागला. एमआयएमचे प्रमुख अकबर ओवेसी आणि असदोद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावर दोन जाहीर सभा घेऊन इम्तियाज जलील यांच्या विजयावर जणू शिक्कामोर्तबच केले होते.