शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे जोशी राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:53 IST

औरंगाबादचे क्रीडा संघटक श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचे जय कवळी हे अध्यक्षपदी असणार आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची सर्वसाधारण सभा ठाणे येथे नुकतीच पार पडली.

औरंगाबाद : औरंगाबादचे क्रीडा संघटक श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचे जय कवळी हे अध्यक्षपदी असणार आहेत.महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची सर्वसाधारण सभा ठाणे येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत २0१८ ते २0२२ या कालावधीसाठी निवडणूक अधिकारी अ‍ॅड. बी. जी. आगवणे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. या निवडणुकीला भारतीय बॉक्सिंग महासंघाचे निरीक्षक राजेश देसाई व महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे महेश लोहार उपस्थित होते.औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष असणारे माजी आ. श्रीकांत जोशी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने राज्य संघटनेत मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळाले आहे. श्रीकांत जोशी यांच्यासह आॅलिम्पियन मनोज पिंगळे, शाहू बिराजदार, गोपाळ देवांग, गुरुप्रसाद रेगे, सतेज पाटील, रमेश बागवे, राहुल पाटील यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली. महासचिवपदी चंद्रपूर येथील राकेश तिवारी व खजिनदारपदी एकनाथ चव्हाण यांचीही निवड झाली आहे. श्रीकांत जोशी यांच्या निवडीबद्दल औरंगाबाद बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष एकनाथ जाधव, केजल भट्ट, सचिव पंकज भारसाखळे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, सतीश भट्ट, प्रदीप खांड्रे, नीरज भारसाखळे, राहुल टाक, अनिल मिरकर, अजय जाधव व रवींद्र माळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.