औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सन संघाने बजाज आॅटोवर, तर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक (आयआयए) संघाने जिल्हा वकील वरिष्ठ संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात विजय ढेकळे व रजा कुरेशी सामनावीर ठरले. शुभम हरकळनेही अर्धशतक ठोकत आपला ठसा उमटवला.पहिल्या सामन्यात बजाज आॅटोने २0 षटकांत ९ बाद ८४ धावा केल्या. त्यांच्याकडून राजा चांदेकरने १३ व नवनाथ कुबेरने ११ धावा केल्या. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनतर्फे विजय ढेकळेने ६ धावांत ३ व सचिन सबनीस, रणजित वुके यांनी प्रत्येकी २, तर अनिरुद्ध पुजारीने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॉन्सनने विजयी लक्ष्य ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून स्वप्नील खडसेने १६ चेंडूंत ७ चौकारांसह ३१, प्रवीण क्षीरसागरने २१ धावा केल्या. बजाजकडून राजा चांदेकर, अली बकोदा, रियाज जहागीरदार, तितिक्ष बियाणी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात आयआयएने २0 षटकांत ७ बाद १६१ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम हरकळने ४९ चेंडूंत ८ चौकारांसह ५७, अमोल खरातने २६ चेंडूंत २ चौकार ३ षटकारांसह ४२, अमोल पवारने २ चौकार व एका षटकारासह २८ व युसूफ शेखने १४ धावा केल्या. जिल्हा वकील वरिष्ठ संघाकडून खालीद सिद्दीकीने २८ धावांत २, तर अभिलेष पवार, दीपक मनोरकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जिल्हा वकील संघ १३१ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून कर्णधार उदय पांडेने एकाकी झुंज देत ३३ चेंडूंत २ षटकार व ६ चौकारांसह ५६, दीपक मनोरकरने २४ व खालीद सिद्दीकीने १४ धावा केल्या. आय.आय.ए.कडून रजा कुरेशीने १४ धावांत ५ गडी बाद केले. सुनील भालेने १२ धावांत ४ व समीर यादवने १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात महेश सावंत, विष्णू बब्बीरवाल यांनी काम पाहिले. गुणलेखन तन्मय ढगेने केले.उद्या, ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३0 वा. शहर पोलीस ब वि. मनपा, सकाळी ११ वा. बडवे इंजिनिअरिंग वि. स्कोडा आॅटो व दुपारी २.१५ वा. एआयटीजी व वैद्यकीय प्रतिनिधी क यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार असल्याचे संयोजक गंगाधर शेवाळे व दामोदार मानकापे यांनी कळवले.
जॉन्सन, आय.आय.ए. उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:53 IST
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत जॉन्सन अँड जॉन्सन संघाने बजाज आॅटोवर, तर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक (आयआयए) संघाने जिल्हा वकील वरिष्ठ संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात विजय ढेकळे व रजा कुरेशी सामनावीर ठरले. शुभम हरकळनेही अर्धशतक ठोकत आपला ठसा उमटवला.
जॉन्सन, आय.आय.ए. उपांत्यपूर्व फेरीत
ठळक मुद्देशुभमचे अर्धशतक : विजय ढेकळे, रजा कुरेशी सामनावीर