शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सहस्र दीपांनी उजळले जटवाडा!

By admin | Updated: December 19, 2014 01:00 IST

उदयकुमार जैन, औरंगाबाद श्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जटवाडा येथे गुरुवारी वार्षिक यात्रा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

उदयकुमार जैन, औरंगाबादश्री १००८ संकटहर पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र जटवाडा येथे गुरुवारी वार्षिक यात्रा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. पार्श्वनाथ भगवंतांच्या २७९१ व्या जन्मकल्याणक दिवसाचे औचित्य साधून भाविकांच्या हस्ते २७९१ दीपांनी भगवंतांची महाआरती करण्यात आली. हा दीपोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळा या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.यंदाची यात्रा लक्षवेधी ठरली ती महाआरतीमुळे. भक्तिभावाचे मंगलमय सूर आणि गुलाबी थंडीत देशभरातील हजारो भाविकांची मांदियाळी दिवसभर येथे दिसली. सकाळी नेमीचंद, विपीन, भारती, नितीन, अश्विनी कासलीवाल परिवाराच्या हस्ते कल्याण मंदिर विधान पूजन झाल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. यानंतर प्रेमचंद, सुरेशचंद, मयूरकुमार, मधुरकुमार अजमेरा परिवाराच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले. बोलियाच्या कार्यक्रमानंतर कुबेर चौगुले (उदगाव) यांच्या साग्रसंगीतात भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी ससंघ उपस्थित असलेले संकटमोचन रोगनिवारक मुनीश्री १०८ गिरणारसागरजी महाराज, संस्कारसागरजी महाराज, गणिनी आर्यिकारत्न श्री १०५ क्षमाश्री माताजी यांच्या मंत्रोच्चाराने भाविकांचा उत्साह वाढत होता. इंद्र-इंद्रायणीचा मान भरतकुमार शांतीलाल डोंगरे परिवाराला, अर्चनाफलचा मान प्रमोदकुमार हंसराज पांडे परिवाराला, तर शांतीधाराचा मान धरमचंद चांदमल पाटणी परिवाराला मिळाला. महाप्रसाददाता फुलचंद, प्रमोदकुमार, कुणाल, भवित, सुषमा, रेखा, कुशानी दगडा परिवारासह सर्व दात्यांचा अतिशय क्षेत्रातर्फे सत्कार करण्यात आला. संचालन महामंत्री देवेंद्र काला यांनी केले. यशस्वीतेसाठी क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांसह ललित पाटणी, एम.आर. बडजाते, प्रमोदकुमार कासलीवाल, महावीर साहुजी, केशरीनाथ जैन, संजय पाटणी, अशोक गंगवाल, कमल कासलीवाल, रमणलाल गंगवाल, मनोज चांदीवाल, सूर्यकांत साहुजी, अशोक अजमेरा, प्रकाश कासलीवाल, प्रमोद पांडे, भरत ठोळे, सुरेश कासलीवाल आदींसह कर्मचारी, समाजबांधव, महिलांनी परिश्रम घेतले. गर्दीमुळे जटवाड्याला पंढरीचे स्वरूप आले होते. यात्रेकरूंसाठी क्षेत्रातर्फे सुसज्ज नियोजन करण्यात आले होते.संतांची अमृतवाणीमुनीश्री १०८ गिरणारसागरजी महाराज व क्षमाश्री माताजी यांचे प्रवचन झाले. महाराजांनी जटवाडा, कचनेर, पैठण, वेरूळ येथील अतिशय क्षेत्रांची महती विशद केली. अतिशय क्षेत्रावर येऊन दर्शन घेतल्याने संकटे आपोआप दूर होतात, असे त्यांनी सांगितले.खराब रस्त्यामुळे त्रासजटवाडा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, आज यात्रेसाठी आलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. खड्ड्यांमुळे वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते. बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.