जालना : पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सदर बाजार पोलिस व दामिनी पथकासह सोमवारी सायंकाळी शहरातील काही भागात अचानक जाऊन पानटपऱ्यांची तपासणी केली. यात अनेक टपऱ्यांवर गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या. याप्रकरणी संबंधितांवर पोलिस कारवाई करण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिस अधीक्षक सिंह यांच्यासह पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी बसस्थानक, रामनगर, गांधीनगर, अलंकार परिसर, सिंधीबाजार, जुना मोंढा परिसर इत्यादी भागात पानटपऱ्यांची तपासणी केली. या प्रकारामुळे टपरीचालकांमध्ये घबराट निर्माण झाली.याप्रकरणी संबंधितांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)
पोलिस अधीक्षकांकडून झाडाझडती
By admin | Updated: April 14, 2015 00:36 IST