शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पर्समधून दागिने लांबविले

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

सिल्लोड : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवासी महिलेच्या पर्समधून ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना सिल्लोड बसस्थानकावर घडली.

सिल्लोड : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवासी महिलेच्या पर्समधून ७० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास सिल्लोड बसस्थानकावर घडली. याप्रकरणी प्रवासी महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नसरीन रईस शेख (२५), रा.भोकरदन, जि.जालना ही विवाहित महिला माहेरी बोरगाव सारवणी येथून आईसोबत बुधवारी सिल्लोड येथे कपडे व सोन्या-चांदीचे दागिने घेण्यासाठी आली होती. खरेदी संपल्यानंतर सदर महिला बोरगाव सारवणी येथे जाण्यासाठी बसस्थानकावर आली. दुपारी ५ वाजेच्या सुमारास सिल्लोड-कन्नड बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पर्सची चेन उघडून त्यातील दोन तोळे सोन्याचे नेकलेस, ५० भार चांदीचे पायातील चैन असे अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. बसमध्ये चढल्यानंतर पर्सची चेन उघडी दिसली. पर्समध्ये बघितले असता दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात येताच सदर महिला प्रचंड घाबरली. बसस्थानकावरील प्रवाशांनी चोरट्यांचा बराच शोध घेतला; पण प्रवाशांना चोरीचा प्रकार कळेपर्यंत दागिने चोरून चोरटे पसार झाले होते. बसमध्ये चढताना एका अज्ञात महिलेने सदर महिलेला दरवाजामध्ये हेतुपुरस्सर अडथळा निर्माण केला. तो पर्यंत महिलेच्या पाठीमागील एका अज्ञात महिलेने पर्सची चेन उघडून दागिने लंपास केल्याची माहिती सदर महिलेने दिली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक एस.बी. नाईक करीत आहेत. (वार्ताहर)