तळणी: मंठा तालुक्यातील तळणी परिसरातून वाहणारी अत्यंत महत्वाची व मोठी असणारी जीवनदायिनी पूर्णा नदी डिसेंबर महिन्यातच कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे काठावरील गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला समोरे जावे लगण्याची चिन्हे आहेत.देवठाणा, उस्वद, कानडी, हनवतखेडा, लिंबखेडा, पूर्णा पाटी (तळणी), सासखेडा, इंचा, दुधा, टाकळखोपा, वाघाळा, कि र्ला, भुवन व वझर सरक टे या गावांना सुजलाम सुफलाम करणारी ही मुख्यनदी यंदा डिसेंबरच्या सुरूवातीलाच कोरडी पडल्याने ‘पूर्णा उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था या गावांत निर्माण झाली आहे. पाणीटंचाईचे संकटही गहिरे झाले आहे. महसूल विभागाने वाळू माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जीवनदायिनीचे पात्र कोरडेठाक
By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST