शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जीप-दुचाकीची धडक, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:39 IST

जीप आणि तळणीहून वाघाळ्याकडे जाणा-या दुचाकीची टक्कर होऊन दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : कोकरसा येथून सावरगावकडे जाणारी क्रूझर जीप आणि तळणीहून वाघाळ्याकडे जाणा-या दुचाकीची टक्कर होऊन दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. तर क्रूझरमधील सात ते आठ जण गंभीर जखमी झाले. तळणी ते मंठा रोडवरील नेमीनाथ महाराज मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.कोकरसा येथून विदर्भातील सावरगावकडे भरधाव जाणा-या जीपने (क्र. एमएच २२ यू. १६०१) तळणीवरून वाघाळ्याकडे जात असलेल्या दुचाकीला (क्र.एमएच. २० ए.ओ ६२९२ ) मंठा रोडवरील नेमीनाथ मंदिराजवळ जोरदार धडक झाली. हा अपघात दुचाकीवरील राजाराम शेषराव जटाळे (२५) व यशवंता शेषराव बोंडे (३० रा. दोघे वाघाळा ता. मंठा ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जीपमधील अनिता अंबादास चव्हाण (१७ रा. जांभरूण), वंश अंकुश राठोड (३), लिंबाजी भिमला चव्हाण, पूजा संतोष राठोड, संतोष हरिभाऊ चव्हाण ( ३ ), अंकुश मोहन राठोड (३० सर्व रा. कोकरसा ता. मंठा) हे जखमी झाले. जखमींमध्ये अन्य दोघांचा समावेश असून, त्यांची नावे कळू शकली नाहीत. अपघात झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खाजगी दवाखान्यात दाखल केले.या प्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.